एक्स्प्लोर

Buldhana Accident : मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू; 25 ते 30 प्रवासी जखमी

Buldhana Accident : मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती भीषण अपघात (Accident) झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Buldhana Accident : मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती भीषण अपघात (Accident) झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज पहाटे ( 29 जुलै) तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली. 

दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्यानं अपघात

मिळालेल्या माहितीनुसार एम एच 08. 9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तातडीनं मदत कार्य सुरू केले आहे.

जखमींची प्रकृती चिंताजनक 

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळं पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, ग्रामीण पो.नी. एफ.सी. मिर्झा यांनी भेट दिली आहे.

या ट्रॅव्हल्समध्ये हिंगोली जिल्ह्यातील यात्रेकरु होते. हे सर्व यात्रेकरु अमरनाथ यात्रा आटोपून हिंगोलिकडे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. यात्रेकरुंची रॉयल ट्रॅव्हल्सची बस हिंगोलीकडे जाताना विरुद्ध दिशेने अमरावतीहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसने जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रात्री तीन वाजता हा अपघात झाला आहे. सर्व मृत हे हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. मृतकांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली, पूजेमुळे अपघात होणार नसल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Fake Doctor Scam : परदेशातून शिकून आलेले दोन 'बोगस' डॉक्टर अटकेत, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई; आणखी 19 संशयित डॉक्टर रडारवर
परदेशातून शिकून आलेले दोन 'बोगस' डॉक्टर अटकेत, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई; आणखी 19 संशयित डॉक्टर रडारवर
Buldhana Farmer : 'वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली पण कर्ज फिटलं नाही'; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने जीवन संपवलं; मंत्री बावनकुळे पोहोचण्यापूर्वीच दुर्घटना
'वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली पण कर्ज फिटलं नाही'; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने जीवन संपवलं; मंत्री बावनकुळे पोहोचण्यापूर्वीच दुर्घटना
Samruddhi Mahamarg : 'समृद्धी' की मृत्यूमार्ग? 2026च्या पहिल्या आठ महिन्यात 142 अपघात अन् 128 जणांचा मृत्यू; समृद्धी महामार्गावरील अपघातांची धक्कादायक माहिती
'समृद्धी' की मृत्यूमार्ग? 2026च्या पहिल्या आठ महिन्यात 142 अपघात अन् 128 जणांचा मृत्यू; समृद्धी महामार्गावरील अपघातांची धक्कादायक माहिती
Ujani and Jayakwadi Dam: उन्हाचा तडाखा वाढला अन् धरणांचं पाणी कमी होऊ लागलं! उजनी-जायकवाडीच्या बाष्पीभवनाने चिंता वाढवली
उन्हाचा तडाखा वाढला अन् धरणांचं पाणी कमी होऊ लागलं! उजनी-जायकवाडीच्या बाष्पीभवनाने चिंता वाढवली

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget