एक्स्प्लोर

Tarapur Midc Blast | तारापूरमध्ये कंपनीत भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

स्फोट इतका भीषण होता की, कंपनीची इमारतीचा काही भाग कोसळून पडला असून यामध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसतानाच कंपनीत उत्पादन घेण्याचे काम दोन दिवसापूर्वी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

पालघर : तारापूर औद्यागिक वसाहतीमध्ये एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात कंपनी मालक गंभीर जखमी असून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम झोन मधील एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात सात कामगारांचा मृत्यू झाला असून जवळपास आठ कामगार इमारती खाली गाडले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एक महिला तसंच एका मुलीचा समावेश असून जखमी असलेल्या कामगारांवर बोईसर येथील तुंगा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल,  रुग्णवाहिका तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह पालघरचे पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं.

मिळालेली माहिती अशी की, तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 प्लॉटमध्ये तारा नाइट्रेट या खासगी कंपनीत शनिवारी सात वाजताच्या आसपास भीषण स्फोट झाला. कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, कंपनीची इमारतीचा काही भाग कोसळून पडला असून यामध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसतानाच कंपनीत उत्पादन घेण्याचे काम दोन दिवसापूर्वी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

घटनेतील मृतकांची आणि जखमींची नावं

मृतक - इलियाज अंसारी (40), निशु राहुल सिंह (26), माधुरी वशिष्ठ सिंह (46), गोलू सुरेंद्र यादव(19), राजमती देवी सुरेंद्र यादव (40) , मोहन इंगळे (52)

जखमी - मुलायम जगत बहादुर यादव (23), राकेश कुमार, चेतराम जायसवाल (50), सचिन कुमार, रामबाबू यादव (18) रोहित वशिष्ठ सिंह (19), नटवरलाल बी.पटेल (56, प्राची राहुल सिंह (6) ऋतिका राहुल सिंह (3)

स्फोटाने हादरला परिसर

कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटानंतर मोठा आवाज झाला. आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोट इतका भयंकर होता की कंपनीची इमारत कोसळली आहे. स्फोटानंतर कंपनीत भीषण आगही पसरली. यामध्ये बाजूच्या इतर कंपन्यांना याची झळ पोहोचली. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत कंपनीचे मालक नटुभाई पटेल हे देखील होत. ते देखील यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनास्थळी फायरब्रिगेडच्या पाच ते सात गाड्या दाखल झाल्या होत्या. तसेच 9 ते 10 रुग्णवाहिकाही दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. स्फोटाचे कारण मात्र अजूनही समोर आले नाही.

मृतकांचा आकडा वाढण्याची भीती

कंपनीत नायट्रोजन प्रोसेस सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या बाबत अधिकारी काही बोलण्यास तूर्तास तयार नाहीत. यामध्ये 7 गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून काहींना मुंबईला पाठविण्यात येत आहे. मात्र त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदर कंपनी दोन दिवसांपूर्वी चालू करण्यात आली होती. कंपनीचे सिव्हीलचे काम चालू होते. स्फोटात मृत पावलेल्या कामगारांमध्ये एका महिला कामगाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे या अपघातात एक सहा वर्षाचा मुलगा त्यांच्यासोबत होता, त्याला कुठलीही इजा झाली नाही.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत : मुख्यमंत्री 

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 26 October 2026: आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत खास शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत खास शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
दुबईतील 1 कोटीची नोकरी सोडली, भारतात सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला मिळवतेय 2 कोटी 20 लाख, वाचा जिद्दी तरुणीची यशोगाथा
दुबईतील 1 कोटीची नोकरी सोडली, भारतात सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला मिळवतेय 2 कोटी 20 लाख, वाचा जिद्दी तरुणीची यशोगाथा
बॅलेट पेपर हवा होता तर मग राजीव गांधींच्या काळात EVM मशीन का आणली? आठवलेंचा काँग्रेसला सवाल, म्हणाले चुकीचा प्रचार करु नका, तुम्हीही सत्तेवर या
बॅलेट पेपर हवा होता तर मग राजीव गांधींच्या काळात EVM मशीन का आणली? आठवलेंचा काँग्रेसला सवाल, म्हणाले चुकीचा प्रचार करु नका, तुम्हीही सत्तेवर या
Kharge vs Shah : 'खरगेंनी सर्व मर्यादा ओलांडल्या'; मल्लिकार्जुन खरगे यांच्या मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यावर अमित शाहंचा जोरदार पलटवार
'खरगेंनी सर्व मर्यादा ओलांडल्या'; मल्लिकार्जुन खरगे यांच्या मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यावर अमित शाहंचा जोरदार पलटवार

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Embed widget