Anjali Damania: संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महिने पूर्ण, आज तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार का? अंजली दमानियांकडून प्रश्नांची सरबत्ती
Anjali Damania on Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप अनेक प्रश्न आहेत त्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. दोन महिन्यांनंतरही अद्याप देशमुखांना न्याय मिळाला नसल्याची संतापजनक भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळं गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यातील राजकारण तापलं आहे. देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर मकोका लावला आहे. तर प्रकरणाचा सूत्रधार असा आरोप असलेल्या वाल्मिक कराडवरदेखील मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटर्तीय आहेत. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील आमदार खासदारांनी केली आहे. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप अनेक प्रश्न आहेत त्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
...म्हणून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे
या प्रकरणावर त्या म्हणाल्या, दोन महिने उलटले, पण काहीच पुढे सरकताना दिसत नाही. 9 डिसेंबरला एक स्कॉर्पिओ जप्त झाली होती, त्यात दोन मोबाईल जप्त झाले होते. फॉरन्सिक डेटा रिकव्हरी अजून नाही. कारण त्यात एक बड्या नेत्याचा फोन आला होता, त्याचे नाव उघड होणार की नाही, राजकीय दबावामुळे कारवाई योग्य दिशेने होत नाही. धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीच, तो पर्यंत या प्रकरणाला योग्य दिशा मिळणार नाही. धनंजय मुंडे वाल्मिक कराड आर्थिक एकत्र होते, दहशत एकत्र होती, त्यांना वाचवण्याचं काम धनंजय मुंडे करीत होते, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सगळ्यांना पत्र करून झाले, अजित पवारांना भेटून झालं. ऑफिस ऑफ प्रॉफिटचे पेपर दिले. टोलवा टोलव सुरू झाली आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केली आहे.
पोलिसांना हवा तर 24 तासात आरोपी सापडतो
त्यानंतर आता डिटेल पत्र लिहिले आहे, मुख्यमंत्री, लोकायुक्त, अजित पवार, इलेक्शन कमिशन, CBI, CAG आणि ACB ला पाठवत आहे. मंत्री पद काय, तर आमदारकी ही रद्द झाली पाहिजे. मुख्यमंत्र्याना भेटले तेव्हा त्यांनी ते माझ्या पक्षात नाहीत असं सांगितलं म्हणून मी अजित पवार यांना भेटले. पण, टोलवा टोलव सुरू आहे. पण, आता हे पत्र पाहून तरी निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आरोपी शोधला तर मिळेल. पोलिसांना हवा तर 24 तासात आरोपी सापडतो. पण, राजकीय दबाव असेल. काही डॉक्टरांनी पोस्ट मार्टम रिपोर्ट पुन्हा उघडला होता, पण काहीच झाले नाही लोक विसरतील असा वेळकाढू पणा सुरू आहे. हे पत्र सर्वांना पाठवले आहे, कृषी घोटाळा आहे, तो पावणे तीनशे कोटीचा आहे, कॅगने याची चौकशी करावी. मला वाईट याचे वाटते की, सामान्य माणसाला न्याय का मिळत नाही, यंत्रणा बड्या नेत्यांना वाचवतात. हे सर्व बंद व्हायला हवे. त्या दिशेने आपल्याला काम करायला हवे, धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, हा माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवा त्यांचे उत्तर घ्या, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
दमानियांची सोशल मिडिया पोस्ट
“आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन २ महिने पूर्ण झाले. आज तरी राजीनामा होणार का ? आज स्व संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक detailed पत्र, ज्या मधे, धनंजय मुंडे यांच्या वरचे सगळे आरोप, मी पुरव्या सकट, मी मुख्यमंत्री, लोकायुक्त,अजित पवार, इलेक्शन कमिशन, CBI, CAG आणि ACB ला पाठवत आहे. ह्यांचा पाठिंबा जर वाल्मिक कराड ला नसता, तर ही क्रूर हत्या झाली नसती. आज तरी ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील अशी अपेक्षा.
अजून बरेच काही कळणे बाकी आहे….. अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फ़ोन चा डेटा देखील रिट्रीव झालेला नाही. अजून का झाला नाही ? तो बडा नेता कोण आहे, अजून का कळले नाही? जो पर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहे, तो पर्यंत दबाव राहणार. त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे”, अशी सोशल मिडिया पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन २ महिने पूर्ण झाले.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 8, 2025
आज तरी राजीनामा होणार का ?
आज स्व संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक detailed पत्र, ज्या मधे, धनंजय मुंडे यांच्या वरचे सगळे आरोप, मी पुरव्या सकट, मी मुख्यमंत्री, लोकायुक्त,अजित पवार, इलेक्शन कमिशन, CBI, CAG आणि ACB ला…
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

