एक्स्प्लोर

MPSC Student Suicide : एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने बीडमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

MPSC Student Suicide : बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.

MPSC Student Suicide : बीड जिल्ह्यात (Beed District) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून,  एमपीएससीचा (MPSC) पेपर अवघड गेल्याने बीडमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या तरुणाने 30 एप्रिल रोजी झालेल्या एमपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र पेपर अवघड गेल्याने तो चिंतेत होता. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अप्पा पवार असं आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थ्यांचं नाव आहे. दरम्यान याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. 

याबाबत पोलीसंक्दुना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अप्पा पवार असं या विद्यार्थ्यांचं नाव असून, तो मूळचा माजलगाव तालुक्यातील राजेवाडी गावचा रहिवासी आहे. अक्षय हा गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एमपीएससीची तयारी करत होता. दरम्यान 30 एप्रिल रोजी झालेल्या एमपीएससीची परीक्षा देण्याससाठी तो बीडमध्ये आला होता.

तर परीक्षा दिल्यावर त्याला पेपर अवघड गेला होता. त्यामुळे तो चिंतेत होता.  तसेच रविवारी परीक्षा दिल्यानंतर तो बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये त्याच्या मित्राच्या खोलीवर मुक्कामासाठी थांबला होता. पण एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने त्याने मित्राच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर याबाबत मयत अक्षयच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिसांनी फोनवरून माहिती दिली आहे. 

विविध विभागातील एकूण 8 हजार 169 पदे भरली जाणार 

एमपीएससीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2023 आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेकरिता एकूण 4 लाख 67 हजार 85 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठकव्यवस्थेकरिता राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील एकूण 1 हजार 475 परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. सदर पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे 80% उपस्थिती असल्याचे दिसून आले. या परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण 8 हजार 169 पदे भरली जाणार असून, आयोगामार्फत विज्ञापित केलेली आतापर्यंतची ही सर्वोच्च पदसंख्या आहे. तसेच अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

पालकमंत्री काळे की गोरे शेतकऱ्यांना आजच कळलं; अतुल सावेंना स्वाभिमानीच्या पूजा मोरेंनी समोरासमोर सुनावलं

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा लपंडाव! विदर्भ-मराठवाड्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा लपंडाव! विदर्भ-मराठवाड्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
Embed widget