(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालकमंत्री काळे की गोरे शेतकऱ्यांना आजच कळलं; अतुल सावेंना स्वाभिमानीच्या पूजा मोरेंनी समोरासमोर सुनावलं
Beed News : वेळी पालकमंत्र्यांनी आणि पोलिसांनी माध्यमांना कॅमेरे बंद करायला देखील सांगितलं.
Beed News : गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये (Beed District) अवकाळी पावसाने थैमान घातलं असून, शासनाकडून कुठलीच मदत मिळालेली नाही. यातच बीडचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) आज बीडच्या दौऱ्यावर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी पालकमंत्री गोरे आहेत की, काळे आहेत हे आज बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळलं अशा शब्दात त्यांना सुनावलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पूजा मोरे पालकमंत्र्यांना भेटल्या, यावेळी पालकमंत्र्यांनी आणि पोलिसांनी माध्यमांना कॅमेरे बंद करायला देखील सांगितलं.
बीडचे पालकमंत्री अतुल सावे शासकीय ध्वजारोहणासाठी बीडमध्ये आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे या अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी या मागणीसाठी त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सकाळपासूनच नजर कैदेत ठेवलं होतं. तर दुसरीकडे ज्यावेळी पूजा मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अतुल सावेंची भेट घेतली, तेव्हा बीडचे पालकमंत्री काळे की गोरे हे आज बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळालं अशा शब्दात त्यांना सुनावले.
पालकमंत्री हरवले....
बीड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहेत. मात्र असे असताना पालकमंत्री अतुल सावे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी गेले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून याबाबत अनोखे आंदोलन देखील करण्यात आले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे बेपत्ता आहेत, त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला 51 रुपये बक्षीस देण्याचेही घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर करण्यात आली. तर या आशयाचे पोस्टरदेखील गेवराई तालुक्यातील वेगेवेगळ्या भागात लावण्यात आले होते. दरम्यान त्यानंतर आज सावे यांची भेट घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडली.
पूजा मोरे यांना पोलिसांनी केलं नजर कैद
जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना देखील, पालकमंत्री यांना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप मोरे यांनी केला होता. तसेच आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने शासकीय ध्वजारोहणासाठी पालकमंत्री सावे आले असता पूजा मोरे यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोरे यांना सकाळपासूनच नजर कैदेत ठेवलं होतं. तसेच शासकीय कार्यक्रमात कोणताही विरोध होऊ नयेत म्हणून मोरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवत नजर कैदेत ठेवलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या :