Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पुण्यातून सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात
Santsh Deshmukh Case: सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सापडल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे पकडल्याची सूत्रांकडून माहिती आहे. काही वेळात नेमकं कोणत्या आरोपींना पकडले आहे, हे होणार स्पष्ट होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतरच आरोपींचा ठावठिकाणा सापडला, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. यात सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काहीजण फरार झाले होते, त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार होते. त्यांना पकडून देण्यात मदत करणाऱ्यास पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती. कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे तर इतर दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे त्यांना आज कोर्टात देखील हजर केला जाईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सुदर्शन घुले आरोपी आहे आणि सुधीर सांगळे हा सहआरोपी आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी डॉक्टर संभाजी वायभसे यानी या आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केली होती, त्याला बीड प्रथम ताब्यात घेतलं. त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास एस आय टी, सीआयडी करत असली तरी तरीही अटक पोलिसांनी बीडच्या स्थानिक पोलीस यांनी केलेली आहे. लवकरच याबाबतची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक देतील. यासंदर्भातली लवकरच पत्रकार परिषद होणार आहे, याबाबतची माहिती अद्याप अधिकृत नसली तरी देखील, गेल्या 26 दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी होते. जे पळून जाण्यात यशस्वी झाले होते, त्यांना पकडण्यासाठी तीन टीम काम करत होत्या. मात्र, आज या दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आला आहे.
आरोपींना कसं घेतलं ताब्यात?
या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या व्यक्तीने पळून जाण्यासाठी मदत केली होती, त्यांच्याकडून काही लिंक्स मिळाल्या. काही माहिती मिळाली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिघे ज्या लोकांच्या संपर्कात होते, त्यांच्याकडून माहिती घेतली गेली. त्यानंतर पोलिसांनी आणि स्पेशल टीमने त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. या दोघांना पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे. याबाबत कोणताही अधिकृत दुजारा दिलेला नाहीये. या तिघांच्या मागे एसआयटी सोबतच सीआयडी आणि बीड पोलिसांची टीम होती. या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून या आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळवली. त्याचबरोबर या तीन आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद ठेवले होते. नवीन सिम घेतले होते. पण त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची माहिती मिळाली आणि त्या आधारे या दोघांना अटक केलेले आहे. या प्रकरणातील ते मुख्य आरोपी आहेत. तिसरा आरोपी फरार आहेत. त्याला त्याला देखील पकडण्यात पोलिसांना लवकरच यश येईल अशी अपेक्षा आहे. या हत्या प्रकरणांमध्ये डॉक्टर वायबसे यांच्यासह त्याची वकील त्यांना एसआयटीने ताब्यात घेतलेलं आहे.
कोण आहे संभाजी वायभसे?
संभाजी वायभसे हा स्वतःचा हॉस्पिटल बीड शहरांमध्ये काही वर्षांपूर्वी चालवायचा. मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे यांच्यासोबत तो काम करायचा अशी माहिती आहे, ऊसतोड मुकादम असे काम करत असताना त्या तिघांसोबत डॉक्टरचा संबंध आला. संभाजी वायभसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही. त्याची पत्नी वकील आहे. त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं आहे. ते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून संभाजी वायभसे फरार असल्याची माहिती होती. पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. मात्र तो सापडत नव्हता. सुदर्शन घुले सह संभाजी वायभसे देखील राज्याबाहेर गेले असल्याची माहिती होती, त्याने राज्य बाहेर जाऊन सुदर्शन घुले याला मदत केली होती. संभाजी वायभसेपर्यंत पोलीस पोहोचले, तेव्हा या दोघांची माहिती मिळाली अशी माहिती आहे. या प्रकरणाच्या कुटुंबाचा समावेश आहे का याचाही तपास केला जातोय. संभाजी वायभसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला. काल त्याला ताब्यात घेतलं, रात्री त्याला बीडमध्ये आणलं, त्यानंतर त्याची चौकशी झाली. त्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आला आहे.