एक्स्प्लोर

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्येला 90 दिवस पूर्ण, तीन महिन्यात नेमकं काय-काय घडलं? अशी आहे क्रोनोलॉजी

Santosh Deshmukh Murder Case Chronology : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. तर या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा अशी मागणी आता होत आहे. 

बीड: केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने झाले आहेत. या प्रकरणात केज पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एक आरोपी अद्याप फरार आहे. सरपंच हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच त्यांना या प्रकरणात सहआरोपी करा अशीही एक मागणी केली जात आहे. बारामतीमध्ये झालेल्या भव्य मोर्चामध्ये वैभवी देशमुखने आता अजितदादांकडेच न्यायाची मागणी केली आहे. ज्या खंडणी प्रकरणात संतोष देशमुखांची हत्या झाली ती खंडणी कुणासाठी गोळा केली जात होती असा सवाल तीने विचारला. 

सरपंच हत्येचा घटनाक्रम 

- 6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि इतर अनोळखी इसमांनी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि चौघा विरोधात गुन्हा दाखल झाला.

- 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

- 10 डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला. त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली.

- मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थी नंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार झाले. 

- 11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिक घुलेला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली.

- 11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मीक कराडवर आरोप करत यांना दोषी ठरवले.

- सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.

- 11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, अजित पवार गटाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- 12 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी अका असतील त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईची मागणी केली.

- 13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.
 
- 13 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.

- 14 डिसेंबर रोजी केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. 

- 14 डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटेची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली.

- या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी देशमुख कुटुंबीयांना न्यायाची मागणी केली.

- 18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्यात आली.

- 19 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला. यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं.

- 21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला.

- 21 डिसेंबर रोजी शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

- 21 डिसेंबर रोजी नवनीत कावत यांची पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.

- 24 डिसेंबर रोजी मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला.

- 28 डिसेंबर रोजी तीन आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मिक कराडवर खून प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी. या मागणीसाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला. 

- 30 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्यशोधक आंदोलन केले.

- 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण गेला. त्याच दिवशी उशिरा केज न्यायालयात कराडला हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली.

- 3 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर संभाजी वायबसेला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले.

- 4 जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली.

-  त्याच दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील कल्याण मधून अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

- 6 जानेवारी रोजी जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार आणि विष्णू चाटे यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यातील 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

- 7 जानेवारी रोजी पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली.

- 10 जानेवारी रोजी विष्णू चाटेला संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीसाठी घेण्यासाठी सीआयडीने न्यायालयात अर्ज केला.

- 11 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.

- 16 जानेवारी रोजी वाल्मीक कराड याला एसटीने ताब्यात घेतले.

- 18 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.

- 22 तारखेला वाल्मीक कराड vc द्वारे न्यायालयात हजर.

- 27 तारखेला सुदर्शन घुलेला पाच दिवसांची sit कोठडी .

- 31 तारखेला सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

- 4 फेब्रुवारी रोजी वाल्मीक कराड याची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पुन्हा वाढवण्यात आली.

- 5 फेब्रुवारी रोजी आष्टी मतदारसंघातील उद्घाटन कार्यक्रमात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला कडक शासन करणार असल्याचे जाहीर भाषणात सांगितले.

- 5 फेब्रुवारी रोजी वाल्मीक च्या बातम्या का बघतोस असे म्हणत कृष्णा आंधळे च्या वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी शंकर मोहिते नावाच्या मारहाण केली.

- 7 फेब्रुवारी बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा राकेश वाहतूक गौण खनिज उत्खलना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

- 7 फेब्रुवारी सुरेश धस यांनी आका आणि आकाच्या सहकार्याचे नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.

- 8 फेब्रुवारी रोजी सुदर्शन घुले यांच्या मोबाईल मधील डाटा रिकव्हर करण्यात आल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.

- 11 फेब्रुवारी रोजी सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी ने बारावी परीक्षेचा पहिला पेपर दिला.

- 11 फेब्रुवारी रोजी संतोष देशमुख हत्या केल्यानंतर आरोपी धाराशिवच्या वाशी मधून पळाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले.

14 फेब्रुवारी रोजी वाल्मीक करडची बी टीम कार्यरत असल्याचे आरोप धनंजय देशमुख यांनी केले. 

14 फेब्रुवारी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना यांच्या संस्थेवर नोकरीसाठीचे पत्र देण्यात आले यावर कुटुंबासोबत चर्चा करून कळवू असे धनंजय देशमुख म्हणाले. 

14 फेब्रुवारी रोजी सुरेश धनंजय मुंडे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली.

15 फेब्रुवारी रोजी आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत परळीत 73 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केला तसेच 877 कोटी रुपयांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली.

15 फेब्रुवारी रोजी धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली .

15 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. 

16 फेब्रुवारी रोजी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फराळ आरोपी कृष्णा आंधळ्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले.

16 फेब्रुवारी रोजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आई बाबत सोशल माध्यमातून अजय मुंडे यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली .

17 फेब्रुवारी रोजी मसाजोग ग्रामस्थांनी महत्त्वाची बैठक घेतली या बैठकीत नऊ मागण्या त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या. 

18 खासदार सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मस्त जोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट .

संतोष देशमुख यांची हत्या वेगळ्याच कारणातून झाल्याचे दाखवण्याचा कट असल्याचा आरोपही या दिवशी केला गेला. 

21 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांचे भेट घेतली. 

22 फेब्रुवारी रोजी आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे मस्सा जोग येथे भेट घेतली .

24 फेब्रुवारी रोजी धनंजय देशमुख यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.

24 फेब्रुवारी रोजी गावकऱ्यांनी बैठक घेत 25 व 26 तारखेला अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली.

25 फेब्रुवारी रोजी मस्त जोक ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले या आंदोलनासाठी मनोज जडांगे पाटील देखील उपस्थित होते. 

26 फेब्रुवारी रोजी अन्न त्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार बजरंग सोनवणे अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एडवोकेट उज्वल निकम यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.

26 फेब्रुवारी रोजी आमदार सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्या हातून शरबत घेत देशमुख कुटुंबीयांनी अन्न त्याग आंदोलन स्थगित केले. 

27 फेब्रुवारी रोजी बीडच्या न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे दोषारोपपत्र एस आय टी कडून दाखल करण्यात आले. 

28 फेब्रुवारीला बीडच्या कारागृहात वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आला. 

1 मार्च रोजी बीडमध्ये पोस्टिंग नको म्हणत 107 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी विनंती अर्ज आल्याचे समजले. 

1 मार्च रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणे ला केज जिल्हा व सत्र न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले.

2 मार्च रोजी जिल्हा कलाकरातील बराक क्रमांक नऊ मध्ये वाल्मीक कराड असलेल्या कॅमेरे बंद असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आला. 

यासंबंधीचे पत्र संदीप क्षीरसागर यांनी जेल प्रशासनाला दिले.

3 मार्च रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हत्या दरम्यानचे दोषारोप पत्रातील फोटो समोर आल्याने एकच खळबळ उडाली. 

4 मार्च रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्याने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. 

4 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील हे सकाळी 7 वा मसाजोग मध्ये दाखल झाले त्यांनी देशमुख कुटुंबियांची समजूत काढली. 

5 मार्च रोजी परळीत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सकल मराठा समाजाचा कॅन्डल मार्च काढण्यात आला.

7 मार्च रोजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मीक कराड यांनी देखील आपल्या संरक्षणासाठी खंडणी दिल्याचे समोर आले. 

8 मार्च रोजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वैभवी ने दिलेला जबाब समोर आला त्यात माझे बरे वाईट झाले तर आई आणि वैजाची काळजी घे असे संतोष देशमुख म्हणाल्याचे देखील समोर आले.

- 9 मार्च रोजी देशमुख कुटुंबीयांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. 

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. आतापर्यंत या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. यात वाल्मिक कराड याच्या पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी झाली आहे.

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर केज पोलिस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे. त्याचा तपास सध्या सीआयडी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित म्हणून एसआयटीकडून तपास सुरू आहे.

ही बातमी वाचा:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर

व्हिडीओ

Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Bharatshet Gogawale On Danveपैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडीओ दानवेंकडून ट्विट,गोगावले म्हणाले..
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
Devendra Fadnavis: फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...
फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...
Nashik Crime News: सटाण्यामध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
सटाण्यामध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
Akshaye Khanna Dhurandhar Fees: 'धुरंधर'मधल्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना ट्रेंडमध्ये; 'रहमान डकैत' साकारण्यासाठी किती पैसे घेतले?
'धुरंधर'मधल्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना ट्रेंडमध्ये; 'रहमान डकैत' साकारण्यासाठी किती पैसे घेतले?
Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
Embed widget