तरुणाईला भुरळ घालणारी Yamaha RX100 परतणार? कंपनीने दिली 'ही' माहिती
Upcoming Yamaha Bikes: नव्वदीच्या दशकात तरुणांना भुरळ घालणारी Yamaha RX 100 भारतात पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ही बाईक त्याकाळात जितकी लोकप्रिय होती, तितकीच आजही आहे.
Yamaha RX100: नव्वदीच्या दशकात तरुणांना भुरळ घालणारी Yamaha RX 100 भारतात पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ही बाईक त्याकाळात जितकी लोकप्रिय होती, तितकीच आजही आहे. बुलेटनंतर कदाचित देशात यामाहापेक्षा दुसरी कोणतीही बाईक इतकी लोकप्रिय झाली नसेल. ही बाईक 1985 ते 1996 दरम्यान तयार करण्यात आली होती. पण आता यामाहा ही बाईक पुन्हा बाजारात आणू शकते.
काय आहे कंपनीची भविष्यातील योजना?
यामाहा इंडियाचे अध्यक्ष इशिन चिहाना यांनी बिझनेसलाइनला एका मुलाखतीत सांगितले की, कंपनीने अजून कोणत्याही बाईकमध्ये RX 100 हे नाव पुन्हा वापरलेले नाही. कारण कंपनीच्या त्याबाबत भविष्यातील काही योजना आहेत. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, कंपनी RX100 परत बाजारात आणू शकते. असं असलं तरी हे इतके हे सोपे नाही, कारण जुनी Yamaha RX100 ही दोन-स्ट्रोक इंजिनवर आधारित होती आणि जी BS6 उत्सर्जन मानदंडांची पूर्तता करत नाही. अशा परिस्थितीत कंपनीला इंजिन आणि डिझाइन या दोन्हीमध्ये बदल करावे लागतील.
Yamaha India अशा कोणत्याही बाईकला RX100 Legend बाईकचा बॅज देऊ शकत नाही, त्यामुळे कंपनीला RX100 बॅज हाताळू शकेल अशा नवीन बाईकची रचना करावी लागेल. यासाठी कंपनी जुन्या मॉडेलच्या रेट्रो डिझाइनला एकत्र करून नवीन डिझाइन तयार करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कधी होणार लॉन्च?
दरम्यान, RX100 परत येण्याची प्रतीक्षा इतक्या लवकर संपणार नाही. एका रिपोर्ट्सनुसार, कंपनी RX100 परत आणण्याची योजना आखात असली तरी हे बाईक 2025 च्या आधी लॉन्च होणार नाही. सध्या Yamaha च्या पोर्टफोलिओमध्ये फक्त 125cc स्कूटर, 150cc स्ट्रीट आणि 250cc स्ट्रीट बाईक आहेत.
महत्वाच्या बातम्या :