Audi Sedan A8L : बहुप्रतिक्षीत ऑडीची लक्झरी कार आज भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Upcoming Audi Sedan A8L : ऑडीच्या या आगामी लक्झरी कारच्या इंटिरिअरमध्ये तळाशी 8.6-इंचाचा डिस्प्ले आहे, जो हवामान नियंत्रण आणि सीटिंग फंक्शन्स ऑपरेट करण्यात मदत करतो.
Upcoming Audi Sedan A8L : ऑडी (Audi) आपली बहुप्रतिक्षित कार (Car) ऑडी A8L (Audi Sedan A8L) आज भारतात लॉन्च करणार आहे. ही नवीन लक्झरी कार अनेक फिचर्ससह येण्याची अपेक्षा आहे. जी यापूर्वी कोणत्याही ऑडी कारमध्ये दिसली नाही. ही कार भारतीय बाजारपेठेतील लेक्सस एलएस, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास आणि बीएमडब्ल्यू 7-सीरीज सारख्या कारशी स्पर्धा करेल. ऑडी A8 L कारमध्ये नेमकी कोणती खास वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घ्या.
ऑडीने अलीकडेच आपल्या Audi A8 L चा टीझर सादर केला आहे. या टीझरमध्ये OLED लाईटही दिसणार आहे. ही कंपनीची स्वतःची ओळख आहे. कंपनीने जारी केलेल्या या टीझरमध्ये A8L नेक्स्ट लेव्हल अनेक बाबतीत दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने कारचे प्री-बुकिंग 10 लाखांपासून सुरू केले आहे.
ऑडी A8 L चे डिझाईन
नवीन Audi A8 L ला अपडेटेड बंपर आणि क्रोम सराउंडसह स्वतंत्रपणे डिझाईन केलेले डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्ससाठी समर्थन मिळेल. लक्झरी कारला रीप्रोफाइल्ड फ्रंट एंड मिळण्याची शक्यता आहे, ज्याला जाळीचा नमुना मिळेल. A8 L च्या साईड प्रोफाईलबद्दल सांगायचे तर, यात नवीन डिझाइनमध्ये मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स मिळतील.
ऑडी A8 L वैशिष्ट्ये
ऑडीच्या या आगामी लक्झरी कारच्या इंटिरिअरमध्ये तळाशी 8.6-इंचाचा वक्र डिस्प्ले आहे, जो हवामान नियंत्रण आणि सीटिंग फंक्शन्स ऑपरेट करण्यात मदत करतो. यासोबतच डॅशबोर्ड-माउंटेड 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील देण्यात आली आहे, जी नेव्हिगेशन आणि मीडिया नियंत्रित करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारमध्ये दोन अतिरिक्त 10.1-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन देखील या कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी भारत-विशिष्ट व्हर्जनमध्ये दिल्या जाऊ शकतात.
ऑडी A8 L इंजिन
Audi A8 L 2022 ची फेसलिफ्ट आवृत्ती 48V सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, ते सध्याच्या मॉडेलमध्ये उपलब्ध असलेल्या 3.0-लिटर टर्बोचार्ज्ड V6 पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल जे 8-स्पीडसह सेडानसाठी 335 Bhp पॉवर आणि 500 Nm जास्तीत जास्त टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. यात ऑडीची क्वाट्रो AWD सिस्टीम देखील उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या :