Tata Tiago XT Rhythm : नवीन फिचर्ससह Tata Tigor चा XT Rhythm व्हेरिएंट भारतात लॉन्च; किंमत फक्त 6.45 लाख रुपये
Tata Tiago New Variant : Tata ने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक कार Tata Tigor चे XT Rhythm व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. त्याची किंमत 6.45 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
Tata Tiago New Variant : देशातील सर्वात दिग्गज कंपन्यांपैकी टाटा (Tata) ही एक कंपनी आहे. Tata Motors सतत देशात आपली श्रेणी वाढवत आहे. अगदी अलीकडेच, कंपनीने आपल्या सेडान कार टिगोरचे (Tigor) ड्युअल टोन व्हेरिएंट सादर केले होते. नवीन कार लाँच करण्याव्यतिरिक्त, कंपनी वेळोवेळी नवीन व्हेरिएंट सुद्धा बाजारात सादर करते. काही दिवसांपूर्वीच टाटा मोटर्सने टिगोर सेडान कार लॉन्च केली होती. आता कंपनीने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक कार टाटा टिगोरचे XT रिदम (XT Rhythm) व्हेरिएंट भारतात लॉन्च केले आहे. हे मिड व्हेरिएंट XT आणि टॉप व्हेरिएंट XZ+ मधील मध्यम व्हेरिएंट आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.45 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जी तिच्या XT प्रकारापेक्षा 30,000 रुपये जास्त आहे.
हे फिचर्स मिळतील :
नवीन XT Rhythm मध्ये फिचर्ससुद्धा अपडेट करण्यात आले आहेत. XT Rhythm मध्ये इमर्सिव्ह म्युझिक अनुभवासाठी चार स्पीकर आणि चार ट्वीटर, व्हॉइस कमांड सपोर्टसह इमेज आणि व्हिडिओ प्लेबॅक, Apple CarPlay आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यासह अनेक फिचर्स आहेत. डायनॅमिक मार्गदर्शक गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत.
XT व्हेरिएंटसुद्धा अपडेट :
XT Rhythm च्या बाबतीत बोलायचे झाल्यास टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वी या कारच्या XT व्हेरिएंटमध्ये स्टीयरिंग माउंट केलेले नियंत्रण, उंची-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, फॉग लॅम्प आणि अपडेटेड हरमन इन्फोटेनमेंट सिस्टीम यासह अनेक वैशिष्ट्ये जोडली. यासोबतच त्याची किंमतही 15,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
इंजिन :
XT Rhythm च्या इंजिन बाबतीत पाहायला गेले तर, कंपनी Tata Tiago मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन वापरते, जे 85 Bhp पॉवर आणि 113 Nm कमाल टॉर्क जनरेट करू शकते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या :