Car : Kia Sonet X Line चा टीझर रिलीज; काय असेल या कारमध्ये खास? जाणून घ्या
Kia Sonet X Line : ऑटोमेकर कंपनी Kia India ने आपल्या नवीन कारचा अधिकृत टीझर रिलीज केला आहे.
Kia Sonet X Line : ऑटोमेकर कंपनी Kia India ने आपल्या नवीन कारचा अधिकृत टीझर रिलीज केला आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये आगामी कारचा फ्रंट लूक आणि नवीन ग्रिल दिसत आहे. कंपनी हा आगामी X लाईन व्हेरिएंट टॉप स्पेस म्हणून सादर करणार आहे. एकदा हे व्हेरिएंट बाजारात आले की ते टॉप मॉडेल GTX Plus ची जागा घेण्याची शक्यता आहे.
Kia Sonet X Line चा लूक कसा असेल?
Kia Sonet चा टीझर पाहिल्यावर असे लक्षात येते की, किआ सोनेट व्हेरिएंटला ब्लॅक कंपोनेंट्ससह सादर करेल. एक्स लाईन 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. फॉग लॅम्प हाऊसिंग, फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, अलॉय व्हील आणि साइड बॉडी क्लेडिंग देखील डिझाईनसाठी राखून ठेवण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, X लाईनमध्ये पियानो ब्लॅक फिनिश टेलगेट गार्निश, रियर स्किड प्लेट, ड्युअल एक्झॉस्ट टेलपाईप आणि शार्क फिन अँटेना देखील दिसणार आहे.
पॉवरट्रेन कशी असेल?
आगामी Kia Sonnet X लाईनच्या पॉवरट्रेनबद्दल जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु, इंजिनमध्ये कोणताही बदल नसण्याची शक्यता आहे. भारतातील Kia Sonet एकूण चार इंजिन ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. ज्यामध्ये पहिले 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 81.8hp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, हे इंजिन 118bhp पॉवर आणि 172Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर, ग्राहकांना तिसरा पर्याय म्हणून डिझेल इंजिन मिळते. किआ सोनेटला ट्रान्समिशनसाठी ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
टॉप फिचर्स कोणते?
या आगामी टॉप व्हेरियंटमध्ये जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. Kia Sonet X Line ला डार्क केबिन थीम, हवेशीर फ्रंट सीट्ससह 5-सीटर केबिन, हायलाइन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, क्रूझ कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, कीलेस एंट्री, पार्किंग सेन्सर्स आणि मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील यांसारखे फिचर्स उपलब्ध असू शकतात.
किंमत किती?
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, सध्या Kia Sonet च्या टॉप मॉडेलची किंमत 13.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे या आगामी एक्स लाईन व्हेरिएंटची किंमतही साधारण याच्याच जवळपास असू शकते.
महत्वाच्या बातम्या :