(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Auto News : Tata Nexon Facelift EV कार लाँच; पॉवरफुल रेंजसह मिळतील 'ही' जबरदस्त वैशिष्ट्य
Tata Nexon Facelift EV Launched : Tata Nexon Facelift EV थेट Mahindra XUV400 शी स्पर्धा ककणार आहे.
Tata Nexon Facelift EV Launched : दिग्गज कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ने नुकतीच आपली नवीन कार Tata Nexon Facelift EV लॉंच केली आहे. कंपनीने आपले नेक्सॉन पेट्रोल 8.09 लाख रूपये आणि डिझेल व्हेरिएंट 10.99 लाख रूपये किंमतीला लॉन्च केले, तर नेक्सॉन फेसलिफ्ट EV रेंज 14.74 लाख रूपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीवर लॉन्च केली गेली.
टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट EV चा लूक कसा आहे?
Nexon फेसलिफ्ट EV व्हेरियंटला पूर्णतः LED DRL सेट-अप मिळतो, जो चार्जिंग पातळी देखील सूचित करतो. तर चांगल्या रेंजसाठी एरो इन्सर्टमुळे ते वेगळे दिसते. यासोबतच चाकांचे बंपर डिझाइनही नवीन देण्यात आले आहे. त्याच्या मागील स्टाइलमध्येही बदल करण्यात आले आहेत, जे आता पूर्ण रुंदीच्या एलईडी लाईट्सने सुसज्ज आहे. Nexon पेट्रोल/डिझेलसाठी ग्राउंड क्लीयरन्स 208 मिमी आहे, तर Nexon EV मध्ये ते मध्यम रेंज आणि लांब रेंजच्या व्हेरिएंटसाठी 205/190 मिमी आहे.
टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट ईव्ही केबिन
केबिनबद्दल बोलायचे झाले तर नवीन दोन स्पोक स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील पूर्णपणे नवीन आहे. याशिवाय या ईव्हीमध्ये 12.3 इंचाची मोठी स्क्रीन उपलब्ध आहे. तसेच 360 डिग्री कॅमेरा, अनेक कनेक्टेड कार फीचर्स, व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ यांसारख्या नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी, ही SUV आता सहा एअरबॅग्ज आणि ESC सारख्या मानक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट ईव्ही रेंज
Nexon EV मध्ये नवीन मोटर आहे, जी पूर्वीच्या इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत हलकी आणि पॉवरच्या बाबतीत पुढे आहे. लांब रेंज आणि मध्यम रेंजच्या दोन्ही व्हेरिएंटची रेंज साधारण 465 आणि 325 किमी आहे. Tata Nexon facelift EV थेट Mahindra XUV400 शी स्पर्धा करणार आहे.
नवीन Nexon EV मध्ये आता नवीन बॅटरी आहे, जी 20 किलो लाईट आहे. रेंज आणखी वाढवण्यासाठी, EV कमी रोलिंग प्रतिरोधक टायर्ससह देखील उपलब्ध आहे. पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, नवीन Nexon EV 145 आणि 215Nm आहे, जे मॅक्सच्या 143 bhp आणि 250 Nm पॉवर आउटपुटच्या तुलनेत कमी आहे आणि रेंजबद्दल बोलायचे तर, थोड्या बदलांसह त्याच बॅटरी पॅकसह त्याची रेंज 465 किमी आहे, तर कमाल रेंज 453 किमी आहे. इतर बदलांमध्ये V2V आणि V2L सुविधेसह 150 किमी/ताशी स्पीड समाविष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Auto News : Tata Nexon EV फेसलिफ्ट आणि EV Max दोघांमध्ये नेमका फरक काय? वाचा A to Z माहिती