Skoda Electric Car : Skoda Enyaq iV या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग सुरु; कंपनीचा दावा 500 किमी पेक्षा जास्त रेंज मिळेल
Skoda Electric Car : Skoda ची पहिली इलेक्ट्रिक कार Volkswagen ID4 आणि Audi Q4 e-tron सारख्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
Skoda Electric Car : Skoda ची पहिली इलेक्ट्रिक कार, Enyaq iV टेस्टिंग करताना दिसली आहे. ही इलेक्ट्रिक कार Volkswagen ID4 आणि Audi Q4 e-tron सारख्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कंपनीचा असा दावा आहे की, या आगामी इलेक्ट्रिक कारची रेंज 500 किमी पेक्षा जास्त असेल. Skoda ची ही EV 2023 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. या कारमध्ये आणखी काय फीचर्स आहेत. ते जाणून घेऊयात.
कसा असेल लूक?
टेस्टिंग दरम्यान दिसलेला Enyaq iV चा लूक असे दर्शवतो की, हा एक लाउंज ट्रिम आहे. जो ब्लू कलरच्या थीमसह दिसला आहे. Enyaq iV ला क्रिस्टल फेस, रेडिएटर ग्रिल आहे. याशिवाय, यात 19-इंच प्रोटीयस अलॉय व्हील, फुल-साईज 13-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट स्क्रीन, अॅम्बियंट लाइटिंग आणि सिटींग कॉन्ट्रास्ट यलो स्टिचिंग मिळेल. तसेच, लेदर आणि मायक्रोफायबर फॅब्रिक अपहोल्स्ट्री संपूर्ण केबिनमध्ये लेदर स्टिअरिंग व्हील, सिटींग कॉन्ट्रास्ट स्टिचिंगसह दिसेल.
काय असेल बॅटरी रेंज?
आगामी इलेक्ट्रिक कार Enyaq iV मध्ये 77kWh चा बॅटरी पॅक आहे, जो ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्सने जोडलेला आहे. हा बॅटरी पॅक 265bhp पॉवर जनरेट करतो. रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ते एका चार्जवर 513 किमीची रेंज देऊ शकते. त्याच वेळी, ही इलेक्ट्रिक कार 6.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.
केव्हा लॉन्च होईल?
लॉन्च बद्दल बोलायचे झाले तर, स्कोडा Enyaq iV इलेक्ट्रिक 2023 च्या सुरूवातीला बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. भारतीय बाजारपेठेत Enyaq iV लाँच केल्यानंतर, Tata Tigor EV, BMW i4, Land Rover Range Rover Sport 2022 आणि Jeep Meridian सारख्या कार स्पर्धा करतील असे मानले जाते.
महत्वाच्या बातम्या :