New Volkswagen Tiguan : फोक्सवॅगनची शानदार टिगुआन कार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
नवीन तंत्रज्ञान, प्रीमियम व लेटेस्ट फीचर्स आणि सेफ्टी उपकरणांसह ही कार 2.0 लिटर इंजिनच्या पर्यायासह भारतात लाँच झाली. 10 डिसेंबरपासून फोक्सवॅगन टिगुआन फेसलिफ्ट एसयूव्हीच्या चाचणीला सुरूवात होईल
नवी दिल्ली - भारतातील कार चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. फोक्सवॅगनची (Volkswagen) नवीन टिगुआन (Tiguan) कार आज भारतात लाँच झाली. कंपनीने या एसयूव्हीचे टीझर फोटो आणि व्हिडिओ देखील रिलीज केलेत. प्रीमियम फीचर्स, शानदार लुक असलेल्या नवीन Tiguan SUV चे नूकतेच लाँचिंग झाले आहे.
फोक्सवॅगनचीने अपडेट टिगुआन (Tiguan ) गेल्या वर्षी ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केली होती. आता ती भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. नवीन तंत्रज्ञान, प्रीमियम व लेटेस्ट फीचर्स आणि सेफ्टी उपकरणांसह ही कार 2.0 लिटर इंजिनच्या पर्यायासह भारतात लाँच करण्यात आली. येत्या 10 डिसेंबरपासून फोक्सवॅगन टिगुआन फेसलिफ्ट एसयूव्हीच्या चाचणीला सुरूवात होईल. औरंगाबाद येथील प्लांटमध्ये टिगुआच्या फेसलिफ्टचे उत्पादन सुरू आहे.
या कारमध्ये फॉर्च्युनर सारख्या एसयूव्ही असून कॉम्पॅक्ट परंतु प्रीमियम 5-सीटर एसयूव्ही आहेत. फोक्सवॅगनच्या टिगुआनचे भारतात आधीचे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होते. परंतु, कंपनीने नव्या फिचर्सह भारतात पुन्हा एकदा 5 आसनी टिगुआन आणली आहे.
असे आहेत नवे फिचर्स
भारतात लाँच करण्यात आलेल्या नवीन टिगुआनच्या इंटीरियरमध्ये व्हर्च्युअल कॉकपिट, व्हिएन्ना लेदर सीट्स, 30 शेड्स एम्बिएंट लायटिंग, इल्यूमिनेटेड स्कफ प्लेट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, इल्यूमिनेटेड गिअर नॉब, Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट, फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील, मेमरी फंक्शनसह ड्रायव्हर-साइड इलेक्ट्रिक सीट, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल असे फीचर्स आहेत. यात फोक्सवॅगन कनेक्टेड तंत्रज्ञानही देण्यात आले असून त्यामुळे चालकाला कारची सर्व माहिती मिळणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून SUV मध्ये 6-एअरबॅग्ज, चालक अलर्ट सिस्टिम, ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, ESP, ASR, EDL, ऑटो होल्ड, हिल स्टार्ट असिस्ट, रिव्हर्स कॅमेरा आणि हिल डिसेंट कंट्रोल सारखे फीचर्स आहेत. फोक्सवॅगनने 2021 Volkswagen Tiguan facelift ही 5 सीटर एसयूव्ही फक्त एकाच Elegance व्हेरिअंटमध्ये आणली आहे.
Volkswagen Tiguan 2021 ची किंमत
या कारची किंमत भारतीयांना परवडेल असीच आहे. नव्या फिचर्सच्या वाढीमुळे आधीच्या मॉडेलपेक्षा आताच्या मॉडेलची किंमत थोडी जास्त आहे. परंतु, नवीन बंपर या एसयूव्हीला त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक लूक देत आहेत. टेलगेटच्या मध्यभागी टिगुआन अक्षरांसह स्लिमर एलईडी टेललाइट्ससह, एसयूव्हीचा मागील भाग कॉम्पॅक्ट दिसत आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत 31.99 लाख रुपये ठेवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Chopper Crash Ooty: ऊटीमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; CDS बिपिन रावत प्रवास करत असल्याची माहिती
Pooja Sawant: पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; फोटो चर्चेत!