MG ZS EV 2022 : एमजी कंपनीची एमजी झेडएस ईव्ही 2022 सादर, अँड्रॉईड, अॅप्पल कारप्ले कनेक्टीव्हीटीसह अत्याधुनिक फिचर्सचा समावेश
MG ZS EV 2022 : या कारमध्ये 10.1 इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमचाही समावेश असणार असून या कारचा लूकही हटके आहे.
![MG ZS EV 2022 : एमजी कंपनीची एमजी झेडएस ईव्ही 2022 सादर, अँड्रॉईड, अॅप्पल कारप्ले कनेक्टीव्हीटीसह अत्याधुनिक फिचर्सचा समावेश MG hectors MG ZS EV 2022 with touchscreen infotainment system and android apple connectivity MG ZS EV 2022 : एमजी कंपनीची एमजी झेडएस ईव्ही 2022 सादर, अँड्रॉईड, अॅप्पल कारप्ले कनेक्टीव्हीटीसह अत्याधुनिक फिचर्सचा समावेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/e2746213efa5078a5230ad5eafa344ab_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MG ZS EV 2022 : जगभरात ऑटोमेटीक कार्स तसंच अँड्राईड कार्सचं क्रेझ आणणाऱ्या एमजी मोटर्स (MG Motors) कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही 2022 (MG ZS EV 2022) सादर केली आहे. 10.1 इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि फर्स्ट-इन-सेगमेंट अँड्रॉईड आणि अॅप्पल कारप्ले कनेक्टीव्हीटी या खास फिचर्ससह ही कार सादर करण्यात आली आहे. या कारचा लूकही अगदीच हटके आणि डोळ्यात भरणारा आहे.
ही कार प्रवाशांना रिअर-सीटिंग झोनमध्ये असणार आहे. तसंच रिअर सीट सेंटर आर्म-रेस्टसह कपहोल्डर्स आणि सेंटर हेड-रेस्ट आहे. नवीन झेडएस ईव्हीमध्ये मागील प्रवाशांना अधिक आरामदायी सुविधा देण्यासाठी रिअर एअर-कंडिशनिंग वेण्ट्स देखील असणार आहेत. त्यामुळे या कारमध्ये सर्वोत्तम दर्जाचा आरामदायी प्रवास होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.
कारचा दमदार लूक
झेडएस ईव्ही 2022 (MG ZS EV 2022) मध्ये फ्रण्ट-कव्हर्ड ग्रिल आणि आता एमजी लोगोच्या डाव्या बाजूस ठेवण्यात आलेले चार्जिंग सॉकेट, सनरूफ आणि नवीन 17 इंच रिफ्रेश डिझाइन अलॉय व्हील्स आहेत. याशिवाय नवीन झेडएस ईव्ही अपडेटेड फ्रण्ट फेशिया, एलईडी हेडलॅम्प्स, डीआरएल, नवीन अलॉय व्हील डिझाइन, नवीन बंपर आणि नवीन टेल-लाइट डिझाइनसह येणार असल्याने कार लूकमध्ये अगदीच धांसू दिसणार आहे.
हे ही वाचा :
- Tata Nexon vs MG ZS Facelift : Tata Nexon इलेक्ट्रिक आणि MG ZS EV कारचा नवीन लूक, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही...
- Tesla Car : थांबायला सांगितलं तरी न ऐकणाऱ्या ड्रायव्हरलेस टेस्ला कार परत बोलावणार
- Maruti Suzuki Baleno : फेब्रुवारीमध्ये लाँच होणार नवी मारुती सुझुकी बलेनो, 6 एअरबॅग आणि AMT फीचर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)