एक्स्प्लोर

EV : जबरदस्त! अमेरिकेत होणार 'इलेक्ट्रिक रोड'! ज्यावर चालत्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स चार्ज होणार, भारतातही शक्य होणार?  

Electric Road for Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनं इच्छा असूनही अनेकजण घेण्याचं टाळतात. याचं मुख्य कारण आहे इलेक्ट्रिक वाहनं चार्जिंगची अपुरी व्यवस्था. मात्र आता यावर एक जबरदस्त तोडगा निघणार आहे.

Electric Road for Electric Vehicles : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता लोकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत चालला आहे. पण इलेक्ट्रिक वाहनं इच्छा असूनही अनेकजण घेण्याचं टाळतात. याचं मुख्य कारण आहे इलेक्ट्रिक वाहनं चार्जिंगची अपुरी व्यवस्था. मात्र आता यावर एक जबरदस्त तोडगा निघणार आहे. यावर अमेरिका काम करत आहे. अमेरिकेत आता इलेक्ट्रिक वाहने चालत असताना रस्त्यावर चार्ज होण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यूएसएमधील डेट्रॉईटमध्ये वाहन चार्जिंग पायलट प्रोग्रामचा एक भाग म्हणून असा 'इलेक्ट्रिक रोड' तयार केला जाणार आहे.

हा प्रयोग जर अमेरिकेत यशस्वी झाला तर भारतात देखील असा प्रयोग होऊ शकतो का? यावर चर्चा सुरु आहे. भारतामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे मध्येही अशी यंत्रणा कार्यान्वित करता येऊ शकते. त्याच्यासह देशातील सहा एक्स्प्रेस वे मध्येही यंत्रणा राबवता येऊ शकते का? याचा विचार करणे गरजेचे आहे. 
 
मिशिगन डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन (MDOT) ने युनायटेड स्टेट्समधील पहिली सार्वजनिक वायरलेस इन-रोड चार्जिंग सिस्टम तयार करण्यासाठी Electreon द इलेक्ट्रिक रोड सिस्टम (ERS) कंत्राट दिले आहे. या ऐतिहासिक कराराची घोषणा करताना मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर म्हणाले की, विद्युत वाहनांचे उत्पादन वाढवून आणि ग्राहकांच्या खर्चात घट करून गतिशीलता आणि विद्युतीकरणाचे भविष्य घडवण्याचे आमचे ध्येय असल्याने वायरलेस इन-रोड चार्जिंग सिस्टम केली जाणार आहे. 

व्हिटमर म्हणाले की, हा प्रयोग पाहून खरोखर आनंद होत आहे. यामुळं नवीन व्यवसाय संधी आणि उच्च तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. अशा अभूतपूर्व उपक्रमांना पुढे चालू ठेवायला हवं. 

गव्हर्नर व्हिटमर यांनी सप्टेंबर 2021 मध्ये मोटर बेला येथे प्रथम इंडक्टिव्ह व्हेईकल चार्जिंग पायलटची घोषणा केली होती.  MDOTकडून सुरक्षित प्रणाली, स्केलेबल, उद्योग तंत्रज्ञान आणि वाहने यांच्याशी आंतरक्रिया करण्यायोग्य आणि आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ अशा प्रकल्पाची घोषणा केली होती. 

या प्रकल्पासाठी Electreon नेक्स्टएनर्जी आणि जेकब्स इंजिनीअरिंग ग्रुपसोबत काम केलं जाणार आहे. हा प्रकल्प सध्या डेट्रॉईटमध्ये डायनॅमिक आणि स्थिर अशा दोन्ही प्रकारच्या वायरलेस EV चार्जिंगच्या एक मैलापर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प मिशिगन सेंट्रल, मोबिलिटी इनोव्हेशन डिस्ट्रिक्टद्वारे केला जात आहे. 

LIVE TV : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

 

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget