Maruti Suzuki Baleno : फेब्रुवारीमध्ये लाँच होणार नवी मारुती सुझुकी बलेनो, 6 एअरबॅग आणि AMT फीचर
Maruti Suzuki Baleno Launch Date : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) यावर्षी अनेक नवीन कार लाँच करणार आहे. यातीलच एक कार Maruti Suzuki Baleno 2022 या वर्षात लाँच होणार आहे.
Maruti Suzuki Baleno Launch Date : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) यावर्षी अनेक नवीन कार लाँच करणार आहे. यामध्ये नवीन मारुती सुझुकी बलेनोचाही समावेश आहे. नवीन मॉडेलच्या बलेनो कार फेब्रुवारीमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Maruti Suzuki Baleno 2022 ची बुकिंग 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. नेक्सा (Nexa) डीलरशीपवरून तुम्हाला ऑनलाईन देखील प्रीबुकींग करता येणार आहे.
मारुती सुझुकीच्या नवीन पिढीच्या बलेनोचे डिझाईन आधीच ऑनलाईन लीक झाले आहे. या कारच्या एक्सटीरियरला संपूर्ण फेसलिफ्ट देण्यात आले असून इंटीरियरमध्ये बदल करण्यात आले आहेत. हॅचबॅकच्या पॅनललाही नव्याने डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये फ्रंट ग्रिल, हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, फ्रंट आणि रिअर बंपर आणि टेललाइट्स अपडेट केले आहेत. सध्याच्या मॉडेलपेक्षा नवीन कारला अधिक स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. सध्याचे मॉडेल Nexa Blue, Metallic Premium Silver, Magma Grey, Pearl Arctic White आणि Pearl Phoenix Red या कलरमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन बलेनो इतर कोणत्या पर्यायांसाह येणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे.
बॅलेनोच्या तंत्रज्ञानात कोणत्याही मोठ्या अपडेटची अपेक्षा करू नका. नवीन बलेनो सध्याच्या मॉडेलप्रमाणेच इंजिन पर्यायांसह येईल. सर्वात मोठा बदल HUD किंवा हेड अप डिस्प्ले, रियर कॅमेरा डिस्प्ले, क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट असेल. सुरक्षेच्या बाबतीत, यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कारच्या टॉप-एंड प्रकारात तुम्हाला 2 ऐवजी 6 एअरबॅग मिळतील.यासोबत बलेनोची हायब्रीड आवृत्तीही येण्याची शक्यता आहे. सध्याच्या बलेनोला 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळते. यात नवीन ऑपरेटिंग सिस्टमसह 9.0 इंचाची फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, जी टोयोटाच्या सहकार्याने विकसित केली गेली आहे. सुझुकी कनेक्ट टेलिमॅटिक्स सिस्टीम देखील बॅलेनोच्या टॉप स्पेक प्रकारात उपलब्ध असेल. स्विफ्ट कारच्या मॉडेलप्रमाणे याला नवीन स्टीयरिंग व्हील मिळेल, तर डायल पूर्वीप्रमाणेच असेल.
संबंधित बातम्या :
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
- Budget 2022 : यंदा येणार 5G , अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
- मारुती सेलेरियो आणि वॅगनआर मध्ये जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या कोणती कार आहे दमदार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha