(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2023 मध्ये भारतात येणार Maruti Jimny 5-Door Mild Hybrid SUV; ग्राहकांमध्ये उत्सुकता
Maruti Jimny Launch In India : मारुतीची आगामी एसयूव्ही जिम्नी लवकरच भारतात दाखल होणार आहे. ग्राहकांमध्ये Maruti Jimny 5-Door Mild Hybrid SUV बाबात कमालीची उत्सुकता आहे.
Maruti Jimny Launch In India : मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) जिम्नी (Jimny) कार भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी जणू एक रहस्यच बनली आहे. या कारची घोषणा करण्यात आली आहे. पण भारतातील लूक, फिचर्सबाबत अद्याप काहीच माहिती देण्यात आलेली नाही. ग्राहकांमध्ये या जिम्नी कारची मोठी उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात या एसयूव्हीची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. पण आता ही परवडणारी एसयूव्ही लवकरच वेगळ्या स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये 4-स्पीड ऑटोमॅटिक आणि 5-स्पीड मॅन्युअल पर्यायांसह 3-डोअरच्या जुन्या लूकमध्ये जिम्नी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
मारुतीच्या इतर गाड्यांप्रमाणे, जिम्नी 5-डोअर (Jimny 5-Door) मॉडेल आता भारतात लवकरच माइल्ड हायब्रिड (Mild Hybrid) इंजिनसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. नवा फ्रंट लूक आणि रियर डोअरमुळे 5-डोअर जिम्नीचा व्हिलबेस रुंद आणि वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. जिम्नीच्या 5 डोअर वाल्या डिझाइनबाबत बोलायचं झालं तर, ही कार भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. भारतीय बाजारपठेत ही कार लॉन्च करताना कारच्या आतमधील स्पेसचाही कंपनी विचार करताना दिसणार आहे.
मारुतीची आगामी अफॉर्डेबल एसयूव्ही जिम्नी (Offroader SUV Jimny) भारतात ऑटो एक्सपोमध्ये आधीच दाखवण्यात आली होती. पण हे फक्त एक ग्लोबल मॉडेल होतं, जे आता कंपनीकडून भारतीय बाजाराच्या गरजेनुसार बदललं जाण्याची शक्यता आहे. नवीन आगामी 5 डोअर जिमनी (5-Door Mild Hybrid SUV) सध्याच्या ग्लोबल मॉडेलपेक्षा अधिक वैशिष्ट्यांसह भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, या नवीन कारमधून मोठा टचस्क्रीन आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह नवीन ब्रेझा सारख्या अनेक प्रीमियम वैशिष्ट्यांची अपेक्षा केली जाऊ शकते. ब्रेझा प्रमाणे, याला 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक फॉर्ममध्ये नवीन माइल्ड हायब्रिड 1.5L पेट्रोल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक मिळेल. जिम्नी पूर्वीसारखीच 4x4 सिस्टमसोबत लॉन्च होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :