एक्स्प्लोर

Anand Mahindra FIR Case: अपघातात एअरबॅग न उघडल्याचा आरोप... एका डॉक्टरचा मृत्यू; आनंद महिंद्रांविरोधात FIR, कंपनीचं म्हणणं काय?

Anand Mahindra FIR Case: कानपूरमध्ये एका व्यक्तीनं महिंद्रा अँड महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रांसह 13 जणांच्या विरोधात FIR दाखल केला आहे.

Anand Mahindra FIR Case: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपुरात राहणाऱ्या एका व्यक्तीनं महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्यासह 13 जणांविरोधात एफआयआर दाखल केला होता. एफआयआर दाखल करणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे की, त्यांनं आपल्या मुलाला महिंद्रा स्कॉर्पिओ भेट दिली होती आणि जानेवारी 2022 मध्ये त्यांच्या मुलाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांनी आनंद महिंद्रा आणि कंपनीच्या इतर 12 कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. आता याप्रकरणी महिंद्राकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. 

प्रकरण नेमकं काय? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजेश यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्यानं त्याचा एकुलता एक मुलगा अपूर्व मिश्रा याला एक स्कॉर्पिओ कार भेट दिली होती. 14 जानेवारी 2022 रोजी अपूर्व आपल्या मित्रांसह लखनौहून कानपूरला या वाहनानं परतत होता. त्यावेळी धुक्यामुळे त्यांची कार दुभाजकावर आदळली आणि या अपघातात अपूर्वचा मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशातील तिरुपती ऑटोमोबाईल्समधून तक्रारदारानं एसयूव्ही खरेदी केली होती. अपघातानंतर त्यांच्या तक्रारदारानं संवाद साधला. 29 जानेवारी 2022 रोजी तक्रारदार एसयूव्ही घेऊन शोरूममध्ये पोहोचले आणि गाडीमधील काही प्रॉब्लेम्स सांगितले. सीट बेल्ट असूनही एअरबॅग उघडली नसल्याचंही सांगत तक्रारदारानं शोरूमवाल्यांना काही प्रश्न विचारले आणि फसवणूक करून कार विकल्याचा आरोपही केला. वाहनाची नीट तपासणी केली असती तर मुलाचा मृत्यू झाला नसता, असंही तक्रारदारानं म्हटलं आहे. 

आनंद महिंद्रांवर FIR 

राजेश यांनी तक्रार दाखल केल्यानंतर महिंद्रा ग्रुपचे चेयरमॅन आनंद महिंद्रांसह 12 इतर व्यक्तींविरोधातही कानपूरच्या रायपूरवा पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये महिंद्रा अँड महिंद्रांच्या गाड्यांच्या सुरक्षेच्या सुविधांबाबत खोटी आश्वासनं देण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. तक्रारदार राजेश मिश्रा यांनी एफआयआर दाखल करताना आरोप केला आहे की, अपघात झाला त्यावेळी त्यांच्या मुलानं सीट बेल्ट लावला होता. परंतु, तरिदेखील गाडीत एयरबॅग डिप्लॉय झाल्या नाही, ज्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. 

एफआयआरमध्ये, राजेश मिश्रा यांनी दावा केला आहे की, महिंद्रानं जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रचार केलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल खात्री पटल्यानंतर त्यांनी 17.40 लाख रुपयांची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली होती. त्यांनी ही कार त्यांचा मुलगा अपूर्व मिश्रा याला भेट दिली होती, ज्याचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

कंपनीचं म्हणणं काय? 

एफआयआर दाखल झाल्यानंतर आता कंपनीनं आपलं एक निवेदन जारी करत आपली बाजू मांडली आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, हे प्रकरण 18 महिन्यांपेक्षाही जुनं आहे आणि सांगितली जात असलेली घटना जानेवारी 2022 मध्ये झाली होती. गाडीमध्ये एअरबॅग नसल्याच्या आरोपांवरही कंपनीनं प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, "2020 मध्ये उत्पादित केलेल्या Scorpio S9 प्रकारात एअरबॅग्ज होत्या हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो." दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्राने या प्रकरणाची चौकशी केली आहे आणि एअरबॅगमध्ये कोणताही दोष आढळला नाही.

अजूनही तपासात सहकार्य करण्यासाठी कंपनी वचनबद्ध 

कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, या घटनेत, महिंद्रा अँड महिंद्रानं ऑक्टोबर 2022 मध्ये तपशीलवार तांत्रिक तपासणी केली होती. हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे आणि ते पुढील कोणत्याही तपासासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास वचनबद्ध आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
Embed widget