होंडा घेऊन येत आहे नवीन WR-V, जाणून घ्या कधी होणार लॉन्च...
Honda WR- V: जपानी वाहन उत्पादक कंपनी Honda Motors ने GIIAS म्हणजेच Gaikindo इंडोनेशियन इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये त्यांच्या उत्पादनांची नवीन रेंज प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.
Honda WR- V: जपानी वाहन उत्पादक कंपनी Honda Motors ने GIIAS म्हणजेच Gaikindo इंडोनेशियन इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये त्यांच्या उत्पादनांची नवीन रेंज प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. होंडा शोमध्ये RS SUV संकल्पनेवर आधारित आपली नवीन SUV चे अनावरण करणार आहे.
नेक्स्ट जनरेशन WR-V
होंडाची आगामी कार नेक्स्ट gen WR-V मॉडेल असण्याची अपेक्षा आहे. होंडा ही कार पुढील महिन्याच्या 11 किंवा 12 तारखेला सादर करेल अशी अपेक्षा आहे. असं असलं तरी कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र कंपनी ही कार लवकरच सादर करणार असल्याचं बोललं जात आहे.
होंडाला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येत आहे नवीन कार
होंडाला टक्कर देण्यासाठी मारुतीही या सेगमेंटमध्ये आपल्या नवीन गाड्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मारुती लवकरच आपली Jimny Long कार लॉन्च करणार आहे. कंपनीची ही बहुप्रतीक्षित कार असून याबाबत बाजारात खूप चर्चा देखील आहे. कंपनी ही कार 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये सादर करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.लाँग व्हील बेससह येणारी ही कार मारुतीची 5 डोअर एसयूव्ही असणार आहे.
मारुती कूप कारवरही करत आहे काम
जिमनी सोबत मारुती YTB कोडनेमसह कूप कारवर देखील काम करत आहे. मात्र सध्या या कारबाबत फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही. मारुती ही कार आपल्या ब्रेझा कारसह विकू शकते. या कारची पहिली झलक पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये दिसण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Car : कुटुंबाच्या सुरक्षेसाठी 'या' आहेत भारतातील 11 सर्वात सुरक्षित कार; ही आहे संपू्र्ण लिस्ट
- Hyundai Discount Offers : Hyundai ची मान्सून ऑफर; 'या' गाड्यांवर तब्बल 50 हजारांची सूट
- Scorpio N Delivery : ठरलं! 'या' दिवसापासून बहुप्रतिक्षित महिंद्रा Scorpio N ची डिलिव्हरी सुरु होणार