इलॉन मस्क खरेदी करत आहे जगातील सर्वात महागडे लक्झरी प्रायव्हेट जेट, किंमत जाणून व्हाल थक्क
Elon Musk Luxury Private Jet: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी अलीकडेच मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर खरेदी केलं आहे. इलॉन मस्क आता जगातील सर्वात महागडे लक्झरी प्रायव्हेट जेट खरेदी करणार आहे.
Elon Musk Luxury Private Jet: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी अलीकडेच मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर खरेदी केलं आहे. इलॉन मस्क आता जगातील सर्वात महागडे लक्झरी प्रायव्हेट जेट खरेदी करणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर या जेटची खूप चर्चा होतं आहे. त्यांना लवकरच याची डिलिव्हरी मिळणार आहे. या जेटची किंमत सुमारे 78 मिलियन डॉलर्स असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास 650 कोटी रुपये इतकी आहे.
एका रिपोर्टनुसार, इलॉन मस्क यांनी Gulfstream G700 जेट खरेदी केले आहे. ज्याची डिलिव्हरी त्यांना पुढील वर्षाच्या सुरुवातीला मिळू शकते. हे एक खाजगी लक्झरी जेट आहे. जे अनेक लक्झरी सुविधा आणि फीचर्सने सुसज्ज आहे. याच्या केबिनची लांबी 57 फुटांपेक्षा जास्त आहे. तसेच याची इंधन टाकी 7,500 Nautical Miles इतकी आहे. म्हणजे हे विमान संपूर्ण टाकीच्या इंधनावर सुमारे 14,000 किमी अंतर पार करू शकते. एकदा इंधन भरले की हे विमान भारत ते अमेरिकपर्यंत उड्डाण करू शकते.
मस्क यांनी खरेदी केलेल्या गल्फस्ट्रीम एरोस्पेस कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार, G700 हे सर्वात मोठे आणि सर्वात आलिशान खाजगी जेट आहे. यात दोन Rolls-Royce इंजिन देण्यात आले आहेत. या जेटची स्वतःची वाय-फाय सिस्टीम आहे. यात 20 अंडाकृती खिडक्या आणि दोन बाथरूम आहेत. या खासगी जेटमध्ये क्रू मेंबर्ससह 19 प्रवासी प्रवास करू शकतात. हे जेट गल्फस्ट्रीमचे G650 वाइड मॉडेल आहे. अधिकृत गल्फस्ट्रीम माहितीनुसार, याची लांबी 109 फूट आणि उंची 25 फूट आहे. हे विमान मॅच 0.925 च्या कमाल वेगाने उड्डाण करू शकते. रिपोर्टनुसार, G700 खाजगी जेट मस्कच्या सध्याच्या खाजगी जेट G650ER ची जागा घेईल. जे त्यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये खरेदी केले होते. मस्क हे अनेकदा प्रवासासाठी खाजगी विमान वापरतात.
इलॉन मस्क यांच्याकडे किती आहे खासगी विमान?
इलॉन मस्क यांच्याकडे सध्या चार खासगी जेट आहेत. त्यापैकी तीन गल्फस्ट्रीमने बनवले आहेत. मस्क यांच्याकडे Dassault 900B हे पहिले खाजगी विमान देखील आहे. मस्कची सर्व विमाने फाल्कन लँडिंग एलएलसीकडे नोंदणीकृत आहेत. दरम्यान, इलॉन मस्क यांच्याकडे विमान कलेक्शन सोबतच मोठे आणि आलिशान कार कलेक्शन आहे. ज्यात Jaguar E-Type, Tesla Roadster , Audi Q7 , Porsche 911 Turbo , Tesla Model X आणि Tesla Model S सारखेच्या कारचा समावेश आहे.
इतर महत्वाची बातमी:
टाटा मोटर्सने पुन्हा वाढवल्या प्रवासी वाहनांच्या किंमती, 7 नोव्हेंबरपासून कार खरेदी करणं होणार महाग