Citroen C3 इलेक्ट्रिक कार भारतात होणार लॉन्च, Tiago EV ला देणार टक्कर
Citroen C3 EV: कार निर्माता कंपनी Citroen लवकरच आपली C3 चे इलेक्ट्रिक व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे.
Citroen C3 EV: कार निर्माता कंपनी Citroen लवकरच आपली C3 चे इलेक्ट्रिक व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. या बातमीला कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने याला दुजोरा दिला आहे. C3 इलेक्ट्रिक पुढील वर्षी जानेवारीमध्ये लॉन्च होईल. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ही कार एक नवीन पर्याय म्हणून समोर येणार आहे. C3 इलेक्ट्रिकची नुकतीच लॉन्च झालेल्या Tata Tiago EV शी स्पर्धा होईल. या कारचे फिचर्स आणि इतर तपशील अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत. मात्र यात कंपनी अनेक आधुनिक फीचर्स देईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Citroen C3 Ev Range : किती मिळणार रेंज?
C3 EV मध्ये 30.2kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. जो या कारसाठी खूप पॉवरफुल असेल. ही कार फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. तसेच यात चांगली रेंज मिळण्याची अपेक्षा आहे, जी सुमारे 300 किलोमीटर किंवा त्याहून अधिक असू शकते.
Citroen C3 Ev : कसा असेल लूक?
लूक किंवा स्टाइलबद्दल बोलायचे झाले तर C3 EV मध्ये पेट्रोल C3 पेक्षा जास्त बदल होणार नाही. यामध्ये किरकोळ बदल होण्याची अपेक्षित आहे. गीअरबॉक्समधील बदल वगळता उर्वरित इंटीरियर जवळजवळ सारखेच असेल.
Citroen C3 Ev Price : किंमत
Citroen पेट्रोल च्या तुलनेत C3 किंचित प्रीमियम बदलासह जास्त किंमतीमध्ये C3 EV सादर होण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, याची किंमत जवळपास 12 लाख रुपये असू शकते. कंपनीने काही महिन्यांपूर्वी 5-स्पीड आणि 6-स्पीड मॅन्युअलच्या निवडीमध्ये टर्बो पेट्रोल आणि Naturally Aspirated 1.2L सह C3 लॉन्च केली होती. EV व्हर्जनमध्ये C3 ला मॅन्युअल गिअरबॉक्ससह स्वयंचलित टॉर्क कनवर्टर पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यन, कंपनीला C3 EV कडून खूप अपेक्षा आहेत. भारतात या कारला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. यासोबतच सिट्रोएन लवकरच देशात इतर उत्पादने लॉन्च करून आपला पोर्टफोलिओ वाढवणार आहे. कंपनी तिचे पुढील नवीन उत्पादन म्हणून भारतीय बाजारपेठेसाठी थ्री रो क्रॉसओवर तयार करत आहे.
इतर ऑटो संबंधित बातम्या: