Car Comparison : Maruti Suzuki Jimny की Force Gurkha? ऑफ-रोडसाठी कोणती कार बेस्ट? वाचा A to Z माहिती
Car Comparison : जर तुम्हालाही ऑफ-रोडिंगची आवड असेल आणि तुमच्यासाठी एक पॉवरफुल फोर व्हीलर ड्राईव्ह एसयूव्ही घ्यायची असेल तर तुमच्यासाठी दोन कारचे ऑप्शन्स आहेत.
Maruti Suzuki Jimny vs Force Gurkha : 2023 चा ऑटो एक्सपो (Auto Expo 2023) कार्यक्रम नुकताच पार पडला. या इव्हेंटमध्ये अनेक कार सादर करण्यात आल्या. यामध्ये मारुतीची ऑफ-रोडर 5-डोअर SUV जिम्नीदेखील (Maruti Suzuki Jimny) सादर करण्यात आली होती. या कारमुळे ऑफ-रोडिंगच्या चाहत्यांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध झाला. कंपनीने या कारसाठी बुकिंगही सुरू केले आहे. जर तुम्हालाही ऑफ-रोडिंगची आवड असेल आणि तुमच्यासाठी एक पॉवरफुल फोर व्हीलर ड्राईव्ह एसयूव्ही घ्यायची असेल. पण दोघांपैकी नेमकी कोणती कार घ्यावी याबाबत जर तुमचा संभ्रम असेल तर तो आज आम्ही दूर करणार आहोत. या ठिकाणी आम्ही दोन्ही कारची तुलना (Car Comparison) केली आहे.
कोणती कार सर्वात मोठी?
- मारुती सुझुकी जिम्नीची लांबी 3,985 मिमी आणि रुंदी 1,645 मिमी आहे. तर, उंची 1,720 मिमी, व्हीलबेस 2,590 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 210 मिमी, 15 इंच अलॉय व्हील्स, 5 डोर, 4 सीटर आहे.
- फोर्स गुरखाची लांबी 4,116 मिमी आणि रुंदी 1,812 मिमी आहे. तसेच, उंची 2,075 मिमी, व्हीलबेस 2,400 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 205 मिमी, 16 इंच स्टील व्हील्स, 3 डोअर, 4 सीटर आहे.
- मारुती सुझुकी जिमनीच्या तुलनेत, फोर्स गुरखा 131 मिमी लांब, 167 मिमी रुंद आणि 355 मिमी जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक स्पेस मिळेल. मारूती जिम्नीच्या कारला 5 डोअर असल्याने मागील सीटवर बसण्यासाठी तसेच बाहेर येण्यासाठी सोपं होतं.
इंजिन कसं आहे?
- मारुती सुझुकी जिम्नीमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे. जे 105PS पॉवर आणि 134.2Nm टॉर्क जनरेट करू शकते. यामध्ये 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेली 4×4 ड्राइव्हट्रेन मिळते.
- फोर्स गुरखाला 2.6 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 91 पीएस पॉवर आणि 5250 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. यात 4×4 ड्राइव्हट्रेनसह 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.
कारची वैशिष्ट्ये काय आहेत?
या दोन्ही SUV मधील सामान्य वैशिष्ट्यांमध्ये DRL सह गोल एलईडी हेडलॅम्प, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay, पॉवर स्टीयरिंग, सेंट्रल लॉकिंग, फॅब्रिक सीट्स, हार्डटॉप रूफ, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि EBD सह ABS यांचा समावेश आहे. जिम्नीवरील अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये स्वयंचलित एलईडी हेडलॅम्प, हेडलॅम्प वॉशर, सहा एअरबॅग्ज, पुश-बटण स्टार्ट-स्टॉप, 9-इंच मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, ऑटो एसी, रीअरव्ह्यू कॅमेरा, ISOFIX चाइल्ड यांचा समावेश आहे. सीट अँकर, क्रूझ कंट्रोल, रिअर-व्ह्यू कॅमेरा, रिअर डीफॉगर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ब्रेक असिस्ट आणि 3-पॉइंट ईएलआर बेल्ट उपलब्ध आहेत.
किंमत किती आहे?
मारुती सुझुकी जिम्नीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, याची सर्वसाधारण किंमत 10-12 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तर, फोर्स मोटर्सच्या गुरखा ऑफ-रोडरची एक्स-शोरूम किंमत 14.75 लाख रुपये आहे.
निष्कर्ष
मारुती सुझुकी जिम्नीची ऑफ-रोडिंग वैशिष्ट्ये, उत्कृष्ट डिझाइन खूप आकर्षित करतात. तर, फोर्स गुरखाचे इंजिन जास्त टॉर्कसह ऑफ-रोडिंग क्षमता देतात.
महत्त्वाच्या बातम्या :