Tata Cars Price Hike: टाटा पुन्हा वाढवणार आपल्या वाहनांची किंमत, जाणून घ्या कोणत्या कारवर किती झाली दरवाढ
Tata Cars Price Hike: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा आपल्या कारच्या किंमती पुन्हा वाढवणार आहे. कंपनीने याची अधिकृत घोषणाही केली आहे. टाटाने याआधीही आपल्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत.
Tata Cars Price Hike: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा आपल्या कारच्या किंमती पुन्हा वाढवणार आहे. कंपनीने याची अधिकृत घोषणाही केली आहे. टाटाने याआधीही आपल्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत. आता कंपनी पुन्हा किंमत वाढ करणार आहे, ज्यामुळे टाटाची कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. टाटा आपल्या कोण-कोणत्या कारची किंमत वाढवणार आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ..
Tata Cars Price Hike: नवीन किंमत कधीपासून होणार लागू?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टाटा 1 फेब्रुवारीपासून आपल्या कारच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने किमतीत वाढ केल्यानंतर टाटा कार 1.2% ने महाग होतील. कारच्या किमतीतील हे बदल मॉडेलनुसार बदलतील.
Tata Cars Price Hike: या गाड्या महागणार
टाटा देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेल सीएनजी आणि ईव्ही वाहनांची विक्रीदेखील करते. टाटा कारच्या किमती वाढवणार आहे, त्यात इलेक्ट्रिक कारचा समावेश नाही. सध्या टाटा फक्त ICE सेगमेंटच्या कारच्या किमती वाढवणार आहे.
Tata Cars Price Hike: या गाड्यांची विक्री करते टाटा मोटर्स
टाटा पॅसेंजर सेगमेंटमध्ये कारच्या विस्तृत श्रेणीची विक्री करते. ज्यामध्ये हॅचबॅक आणि सेडानपासून कॉम्पॅक्ट एसयूव्हीपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. यात टाटाची हॅचबॅक कार टियागो, प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रोझ, कॉम्पॅक्ट सेडान कार टिगोर, सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा पंच, कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा नेक्सन, मध्यम आकाराची एसयूव्ही हॅरियर आणि प्रीमियम एसयूव्ही सफारीचा समावेश आहे.
Tata Cars Price Hike: Tata Cars Price Hike: टाटा इलेक्ट्रिक कार
टाटाच्या पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक (tata electric car) कारचाही समावेश आहे. ज्यात टाटा टिगोर इलेक्ट्रिक, टाटा नेक्सन इलेक्ट्रिक प्राइम आणि टाटा टियागो इलेक्ट्रिक कार समाविष्ट आहे. 2023 मध्ये ICE इंजिन कारच्या किमतीत झालेली ही वाढ 2023 मधील पहिली वाढ आहे.
Tata Cars Price Hike: सेफ्टीसाठी बेस्ट आहे टाटाच्या कार
टाटा मोटर्सच्या (Tata Motors) कार सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच चांगल्या मानल्या जातात. यामुळेच टाटा गाड्यांना एनसीएपी टेस्टमध्ये चांगली रेटिंग मिळाली आहे. टाटाच्या सर्वात सुरक्षित कारमध्ये टाटा पंच, महिंद्रा XUV300, Tata Altroz, Tata Nexon आणि Mahindra XUV700 यांचा समावेश आहे.
इतर महत्वाची बातमी: