(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Best Mileage Bike: 1000 रुपयात धावणार 900 किलोमीटर, 'ही' आहे मायलेज किंग बाईक
Bajaj CT100 Mileage: आज आम्ही तुम्हाला अशा एका बाईकबद्दल सांगणार आहोत, जी पूर्ण टाकी पूल केल्यावर 900 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
Bajaj CT100 Mileage: देशात सर्वाधिक मायलेज (Best Mileage Bike) बाईकची विक्री होते. भारतात लोकांना मायलेज बाईक (Best Mileage Bike) खूप आवडतात. कारण या बाईक कमी पैशात जास्त अंतर कापण्यास सक्षम असतात. तुम्ही या बाईकचा उपयोग रोजच्या प्रवासासाठी ही करू शकतात. या बाईक सामन्यांना परवडणाऱ्या बाईक असतात. या बाईक कमी किमतीत उपलब्ध असतात आणि उत्कृष्ट मायलेज देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बाईकबद्दल सांगणार आहोत. ही बाईक तुम्हाला पूर्ण टाकी पूल केल्यावर 900 किलोमीटरपर्यंत धावू शकते. आम्ही ज्या बाईकबद्दल बोलत आहोत ती आहे 'बजाज CT100' (Bajaj CT100 Mileage) आहे.
Bajaj CT100 Mileage and Features: 1000 रुपयात धावणार 900KM
बजाज CT100 (Bajaj CT100 Mileage) ही बाजारात लोकप्रिय बाईक आहे असून ही जबरदस्त मायलेज देते. या बाईकचे मायलेज 70 ते 90Kmpl पर्यंत आहे. बाईकची इंधन टाकीची क्षमता 10 लिटर आहे. टाकी भरण्यासाठी तुम्हाला सुमारे 1060 रुपये खर्च येईल आणि त्यानंतर तुम्ही 900KM पर्यंत प्रवास करू शकाल.
Bajaj CT100 Price: किती आहे किंमत
सध्या बजाजने बजाज CT100 ची विक्री बंद केली आहे. आता त्याच्या जागी आणखी काही मॉडेल्स आले आहेत. CT100 ची किंमत बंद होण्यापूर्वी 52,832 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) होती. मात्र तुम्ही ही बाईक सेकंड हँड मार्केटमध्ये सहज खरेदी करू शकता. सेकंड हँड वाहनांची विक्री करणार्या काही वेबसाइट्सवर ही बाईक सुमारे 40,000 रुपयांना विकली जात आहे.
Bajaj CT100 Mileage and Features: इंजिन आणि फीचर्स
Bajaj CT100 मध्ये 102cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे 7.9 PS आणि 8.3 Nm आउटपुट देते. याचे वजन फक्त 108 किलो आहे. ही बाईक तीन रंग पर्यायांमध्ये येते - ब्लॅक विथ ब्लू, ब्लॅक विथ रेड आणि फ्लेम रेड. ही TVS स्टार सिटी प्लस आणि Hero HF Deluxe सारख्या बाईक्सशी स्पर्धा करते. यात हॅलोजन लाइट्स, फुल बॉडी ग्राफिक्स, सिंगल-पीस सीट, अलॉय व्हील आणि कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम (CBS) सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
Manasi Tata: कोण आहे मानसी? टाटा कुटुंबातील सून, सोपवण्यात आली टोयोटा कंपनीची जबाबदारी