Auto Expo 2023: देशातील सर्वात मोठा 'ऑटो शो' आजपासून होणार सुरु; जाणून घ्या ठिकाण, वेळ आणि तिकीटाची संपूर्ण माहिती
Auto Expo 2023 Date, Timing & Events: गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून देशातील सर्वात मोठा ऑटो शो 'ऑटो एक्स्पो' सुरु होणार आहे. ऑटो एक्स्पो 2023 एडिशन यावेळी दोन ठिकाणी असेल
Auto Expo 2023 Date, Timing & Events: गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून देशातील सर्वात मोठा ऑटो शो 'ऑटो एक्स्पो' सुरु होणार आहे. ऑटो एक्स्पो 2023 चे 16 वे एडिशन यावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ऑटो एक्स्पो कंपोनंट शोचे आयोजन प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे केले जात आहे. तर ऑटो एक्स्पो मोटर शो ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आला आहे. ऑटो एक्स्पो 2023 बद्दल तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे, ते आम्ही तुम्हाला यातून सांगणार आहोत.
Auto Expo 2023 Date, Timing & Events: ऑटो एक्स्पो 2023 तारीख आणि वेळ
एक्स्पो 2023 चे आयोजन 11 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. पहिले दोन दिवस म्हणजे 11 जानेवारी आणि 12 जानेवारी हे माध्यमांसाठी राखीव आहेत. तर 13 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व्यापार्यांसाठी ते खुले राहील. तसेच 14 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान ऑटो एक्स्पो सर्वसामान्यांसाठी खुला असेल. ऑटो एक्स्पो 2023 शो हा दररोज सकाळी 11 वाजता सुरू होईल. मात्र याची बंद होण्याची वेळ दिवसाप्रमाणे वेगवेगळी आहे. यातच 14 आणि 15 जानेवारी हा मोटर शो सकाळी 11 वाजता सुरु होईल आणि रात्री 8 वाजता बंद होईल. तर 16 - 17 जानेवारीला हा शो सकाळी 11 वाजता सुरु होईल आणि सायंकाळी 7 वाजता बंद होईल. तर 18 जानेवारी हा मोटर शो नेहमीच्या वेळेला सुरु होऊन सायंकाळी 6 वाजता बंद होईल.
Auto Expo 2023 Date, Timing & Events: असं करा तिकीट बुक
जर तुम्हाला ऑटो एक्सपोमध्ये व्हिझिटर म्हणून जायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तिकीट काढावे लागेल. 13 जानेवारीसाठी तिकिटाची किंमत 750 रुपये ठेवण्यात आली आहे. 14 आणि 15 जानेवारीची किंमत 475 रुपये आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या तीन दिवसांसाठी तिकीटाची किंमत 350 रुपये आहे. Auto Expo 2023 ची तिकिटे BookMyShow.com वर खरेदी करता येतील.
Auto Expo 2023 Date, Timing & Events: या कंपन्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये होतील सहभागी
ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अनेक कंपन्या त्यांच्या नवीन वाहनांचे प्रदर्शन आणि लॉन्च करताना दिसतील. एका रिपोर्टनुसार, 114 हून अधिक कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या इव्हेंटमध्ये ऑटोमेकर्सकडून सुमारे 48 नवीन लॉन्च केले जाऊ शकतात. देशातील सर्वात मोठी कार कंपनी, मारुती सुझुकी यावेळी मेटाव्हर्सच्या माध्यमातून आपली वाहने व्हर्चुअली सादर करू शकते. यासाठी कंपनीने ऑटो एक्सपोमध्ये एक वेगळा व्हर्च्युअल झोन तयार केला आहे. ऑटो एक्स्पोमध्ये कंपनी 16 वाहनांची रेंज प्रदर्शित करेल. यामध्ये ग्रँड विटारा, XL6, सियाझ, एर्टिगा, ब्रेझा, बलेनो, स्विफ्ट आणि विद्यमान उत्पादनांच्या सानुकूलित रेंजसह इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही आणि दोन नवीन एसयूव्ही समाविष्ट असतील.
याचप्रमाणे Hyundai Motor India या शोमध्ये आपली इलेक्ट्रिक SUV Hyundai IONIQ5 चे अनावरण करणार आहे. याशिवाय प्रावेग डायनॅमिक्स, वॉर्डविझार्ड आणि इतर सारखे स्टार्टअप इलेक्ट्रिक वाहन उत्पादक देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये त्यांची दुचाकी आणि तीन-चाकी उत्पादने प्रदर्शित करतील. TVS मोटर, Hero MotoCorp, Bajaj Auto, Honda Motorcycle आणि Yamaha सारख्या देशातील मोठ्या कंपन्या देखील नवीन वाहने सादर करतील.