Renault ची नवीन KWID MY22 कार भारतात लॉन्च, कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
वाहन उत्पादक कंपनी Renault ने आज भारतात आपली नवीन KWID MY22 लॉन्च केली आहे. ही कार दिसायला अत्यंत चांगली असून कंपनीने यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत.
वाहन उत्पादक कंपनी Renault ने आज भारतात आपली नवीन KWID MY22 लॉन्च केली आहे. ही कार दिसायला अत्यंत चांगली असून कंपनीने यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. भारतीय बाजारात कंपनीने या कारची किंमत 4.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. चला तर या कारच्या स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
इंजिन आणि रंग
Renault Kwid मध्ये 0.8L आणि 1.0L पेट्रोल इंजिन देण्यात आले आहेत. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे दोन व्हेरियंट आहेत. KWID MY22 मध्ये क्लाइंबर रेंजमध्ये स्पोर्टी व्हाईट अॅक्सेंटसह एक नवीन आकर्षक इंटीरियर आणि एक्सटीरियर कलर कॉम्बिनेशन मिळते. KWID MY22 क्लाइंबर रेंजमध्ये ग्राहकांना नवीन ड्युअल टोन फ्लेक्स व्हील तसेच ब्लॅक रूफसह ड्युअल टोन मेटल कलर ऑफर करते. नवीन RXL (O) प्रकार KWID च्या 0.8L आणि 1.0L MT दोन्ही इंजिनसह सादर करण्यात आला आहे. नवीन RXL(O) प्रकारात स्टाईल आणि इको वाढवणारे फीचर्स देण्यात आले आहे.
फीचर्स
यात फर्स्ट-इन-क्लास 8-इंच टचस्क्रीन MediaNAV इव्होल्यूशन, Android Auto, Apple CarPlay, व्हिडीओ प्ले-बॅक आणि व्हॉइस रेकग्निशनसह इन्फोटेनमेंट सारखे फीचर्स देण्यात आले आहे. जे ड्रायव्हरला कार हॅन्ड फ्री फास्ट आणि सहज नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच यात सिल्व्हर स्ट्रीक LED DRLs एक आकर्षक प्रभाव निर्माण करतात. ग्राहकांना अधिक सुविधा देण्यासाठी यात गाईडलाईन्ससह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे. जो इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM सह कमी जागेतही पार्किंग करण्यात मदत करतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
-
इस तारीख को लॉन्च होगी Royal Enfield की नई बाइक, करीब 1.90 लाख रुपये हो सकती है कीमत
- Electric Vehicle Policy : मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीत 25 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचं उद्दिष्ट; पाच हजार चार्जिंग स्टेशन्स!
- Anand Mahindra : उद्योगपती आनंद महिंद्रांचं नवं पाऊल; आता सुरु करणार मेडिकल काॅलेज
- Anand Mahindra यांनी शब्द पाळला! सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली Bolero