एक्स्प्लोर

SDPI: एसडीपीआय संघटना महानगरपालिका निवडणूक लढवणार

Municipal Corporation Election: औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदतून एसडीपीआयकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

Municipal Corporation Election: आगामी महानगरपालिका निवडणुका (Municipal Corporation Election) लक्षात घेता राज्यातील सर्वच पक्ष (Political Party) कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि औरंगाबादसह (Aurangabad) महत्वाच्या शहरातील महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी आत्तापासूनचं नेतेमंडळी कामाला लागले आहेत. मात्र  असे असतानाच आता देशविरोधी करावयाचा ठपका असल्याने बंदी घालण्यात आलेल्या पीएफआयचं (PFI) राजकीय अंग असल्याचा आरोप असेलल्या एसडीपीआय म्हणजेच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) संघटना महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे. औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदतून एसडीपीआयकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency-NIA), स्थानिक पोलीस आणि ईडीच्या (ED) पथकाने पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर संयुक्त कारवाई केली होती. त्यानंतर पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्यात आली. याचवेळी पीएफआयसोबत एसडीपीआय या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. तर पीएफआयचा एक राजकीय पक्ष म्हणून एसडीपीआयची संघटना असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. त्यामुळे त्यांच्या महानगरपालिका निवडणूकीत उतरण्याच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत बोलतांना एसडीपीआयचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अजहर तांबोळी म्हणाले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची आम्ही तयारी सुरु केली आहे. यासाठी आम्ही प्रत्येक वार्डात आमच्या शाखा स्थापन करणार आहे. तसेच पक्षाची सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच काही पक्ष आणि संघटना यांच्यासोबत युती करण्याबाबत भेटीगाठी देखील केल्या जाणार आहे. सोबतच शहरातील मुस्लिम बहुल वार्डात कचरा, पाणी, ड्रेनिजलाईन चोकअप, रस्त्यावर खड्डे, आरोग्य व शैक्षणिक समस्या असून त्या सोडवण्यासाठी आमचे प्राधान्य असेल, असेही तांबोळी म्हणाले. 

'एमआयएम'ला फटका बसणार? 

काही वर्षांपूर्वी औरंगाबादच्या राजकारणात अचानक एंट्री करणाऱ्या एमआयएमने कमी वेळेत आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केले. शहरातील मुस्लीम बहुल भागात एमआयएमचे नगरसेवक मोठ्याप्रमाणावर निवडून देखील आले. मात्र आता त्याच औरंगाबादच्या महानगरपालिका निवडणुकीत एसडीपीआयची देखील एंट्री होणार आहे. विशेष म्हणजे एमआयएमप्रमाणेच एसडीपीआयचा डोळा देखील मुस्लीम मतांवरच असणार आहे. त्यामुळे याचा फटका एमआयएमला बसणार का? एसडीपीआयला मुस्लीम मतदार किती प्रतिसाद देणार? हे येणारा काळच सांगेल. मात्र एसडीपीआयने महानगरपालिका निवडणुकीत उतरण्याची घोषणा केल्याने शहरातील राजकीय वातावरण मात्र तापण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातमी...

What is PFI SDPI: बंदी घातलेल्या सिमीचा नवा अवतार पीएफआय? जाणून घ्या ही संघटना आहे तरी काय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget