(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jal Akrosh Morcha: भाजपच्या बॅनरवरून गडकरींचा फोटा गायब, शिवसेना म्हणते...
जल आक्रोश मोर्च्या'साठी लावण्यात येणाऱ्या बॅनरवर भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा फोटो गायब असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरात आज (सोमवारी) पाणी प्रश्नावरून भव्य असा मोर्चा काढण्यात येणार असून, त्यापूर्वी भाजपकडून लावण्यात आलेले बॅनर मात्र चर्चेत आले आहेत. कारण शहरातील चौका-चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा फोटो गायब असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही लोकांना आपणच मोठे झालं असल्याचं वाटत असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून विरोधीपक्ष नेते देवंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपकडून शहरभरात यासाठी बॅनर लावण्यात आले आहे. मात्र यातील बहुतांश बॅनर आणि होर्डिंगवर नितीन गडकरी यांचे फोटो नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर महाराष्ट्रातील सर्वच महत्वाचे नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहे. त्यामुळे फक्त गडकरींचाच फोटो का नाही? अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
शिवसेनेची टीका...
शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर गडकरींचा फोटो नसल्याने यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सुद्धा भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 'काही लोंकाना आपणच मोठे झालो आहोत असे वाटत आहे. ह्या बॅनरवर सर्वच छोट्या-मोठ्या नेत्यांचे फोटो आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा ज्या मोदींचे फोटो लावण्यात येते, मात्र त्याच मोदींचे फोटो सुद्धा काही बॅनरवर नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यामुळे हे फोटो का लावण्यात आले नाही हे मलाही कळाले नसल्याचं दानवे म्हणाले.