एक्स्प्लोर
राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा स्वीकारण्यासाठी विधानसभा अध्यक्ष टू व्हीलरवरुन आले
भास्कर जाधव राजीनामा देण्यासाठी औरंगाबादमध्ये आले तेव्हा हरीभाऊ बागडे हे त्यांच्या मतदारसंघातीत कामांमध्ये व्यस्त होते. हरिभाऊ भागडे कुंभेफळ येथे भास्कर जाधव यांना भेटणार होते. ठरलेल्या वेळेत कुंभेफळ येथे पोहोचण्यासाठी बागडे यांनी आज चक्क टू व्हीलरवरुन (मोटारसायकलवरुन) प्रवास करणे पसंत केले.
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जाधव यांना त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द करायचा होता. परंतु हरिभाऊ बागडे सध्या त्यांच्या औरंगाबादमधील फुलंब्री या मतदारसंघात होते. त्यामुळे राजीनामा बागडे यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी जाधव आज औरंगाबादला गेले होते. राजीनामा देण्यासाठी जसा जाधव यांनी औरंगाबादपर्यंतचा प्रवास केला तसाच राजीनामा स्वीकारण्यासाठी हरिभाऊ बागडे यांनीदेखील प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.
भास्कर जाधव राजीनामा देण्यासाठी औरंगाबादमध्ये आले तेव्हा हरीभाऊ बागडे हे त्यांच्या मतदारसंघातीत कामांमध्ये व्यस्त होते. हरिभाऊ भागडे कुंभेफळ येथे भास्कर जाधव यांना भेटणार होते. ठरलेल्या वेळेत कुंभेफळ येथे पोहोचण्यासाठी बागडे यांनी आज चक्क टू व्हीलरवरुन (मोटारसायकलवरुन) जाणे पसंत केले.
आगोदर भास्कर जाधव शिवसेना नेत्यांसोबत कुंभेफळ येथील एका खासगी कार्यालयात पोहोचले. हरीभाऊ बागडे यांना भास्कर जाधव आल्याचा निरोप मिळाला. त्यानंर हरिभाऊ बागडे त्या कार्यालयाकडे निघाले असता रस्त्यात रेल्वे रुळाजवळ फाटक लागलं होतं. रेल्वे येण्यास वेळ होता. ते तिथेच थांबले असते तर पुढील कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी त्यांना उशीर होईल, त्यामुळे हरिभाऊ बागडे यांनी त्यांची कार फाटकाच्या अलिकडेच सोडून पायी रेल्वे रुळ ओलांडला. रुळ ओलांडल्यानंतर पलिकडे असलेल्या दुचाकीवर बसून ते कुंभेफळ येथील कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी जाधव यांचा राजीनामा स्वीकारला.
व्हिडीओ पाहा
यावेळी जाधव यांच्यासोबत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना सरचिटणीस मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्षांनी जाधव यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे जाधव आज (13 सप्टेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुपारी 2 वाजता मातोश्रीवर त्यांचा शिवसेना प्रवेश होईल.
संबंधित बातम्या:
राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, भास्कर जाधवांचा राजीनामा मंजूर, दुपारी शिवबंधन बांधणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement