एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल

Anjali Damania on Devendra Fadnavis : बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.

Anjali Damania on Devendra Fadnavis : बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. शनिवारी बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून राजकीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर गंभीर आरोप केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. तसेच बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश दिले. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.  वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 

अंजली दमानिया म्हणाल्या की, फरार आरोपींची संपत्ती जमा करा, असे आदेश त्यांनी दिले आहे. त्यात वाल्मिक कराडचे नाव आहे की नाही? याची स्पष्टता त्यांनी आपल्यापर्यंत दिलेली नाही. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती त्यांना पुन्हा वरदान म्हणून देण्यात आली, तशीच ही जप्त झालेली संपत्ती तुम्ही पुन्हा देणार असाल तर हे चालणार नाही. तुम्ही स्पष्ट लिहून आदेश द्या की, एकदा जप्त झालेली संपत्ती कोणत्याही कारणाने त्यांना परत दिली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले. 

दहशत पसरवणाऱ्यांवर काय कारवाई होणार? 

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, ज्या लोकांकडे शस्त्र परवाने आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे, असे फडणवीस यांनी आदेश दिले. त्याचे मी स्वागत करते. पण असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे शस्त्र आहेत. पण, परवाने नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करणार? जे दहशत पसरवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? याबाबत देवेंद्र फडणवीस काही म्हणाले नाहीत. याबाबत त्यांनी खुलासे करावेत, असे त्यांनी सांगितले. 

अंजली दमानियांना बीड पोलिसांची नोटीस

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील  तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा अंजली दमानिया यांनी केलाय. यानंतर अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. अंजली दमानिया यांनी फरार आरोपीच्या संदर्भात जो मृत्यूचा दावा केलाय, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे करण्यात आल्या आहेत. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे द्यावे, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. 

आणखी वाचा 

Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoni IND vs NZ Final : ज्याने भारताला विश्वविजेता बनवलं, तो धोनी पहिल्यांदाच प्रेक्षक बनून पाहणार फायनल, IND vs NZ सामन्याला कडक बंदोबस्त, पाहा व्हिडिओ
ज्याने भारताला विश्वविजेता बनवलं, तो धोनी पहिल्यांदाच प्रेक्षक बनून पाहणार फायनल, IND vs NZ सामन्याला कडक बंदोबस्त, पाहा व्हिडिओ
Maharashtra Live blog updates: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत, स्कुटरवर झेप बहीणभाऊ जखमी
Maharashtra Live blog updates: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत, स्कुटरवर झेप बहीणभाऊ जखमी
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका

व्हिडीओ

Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Embed widget