एक्स्प्लोर

"आज मौका देख के, बच्चू कडू को चौका मारेंगे"; जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र!

Bachu Kadu: मला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित प्रकरणात लक्ष घालून गुन्हा दाखल करावा, पत्रातून बच्चू कडू यांची मागणी.

Threat to Bachu Kadu: अमरावती: आपल्या जीवाला धोका असल्याचं एक पत्र बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलं आहे. सखोल चौकशी करावी आणि संबंधित प्रकरणात लक्ष घालून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पत्रातून बच्चू कडू यांनी केली आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांना निनावी फोन येत आहेत. भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न या फोनवरुन बच्चू कडू यांना विचारले जातात. त्यानंतर बच्चू कडू यांनी फोन करणाऱ्यांनाच याबाबत जाब विचारला. अपघात वैगरे काहीच झालेला नसताना असे फोन का येतात? अशी विचारणा का केली जातेय? त्यावेळी बच्चू कडूंना अशा धमक्या येत असल्याचा प्रकार समोर आला. यासंदर्भात बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीनुसार माझ्या जिवीताला धोका असल्याची माहिती बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्राद्वारे दिली आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत असून अपघात झाल्याची अफवा पसरवत असल्याचं बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केलं आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत असून अपघात झाल्याची अफवा पसरवत असल्याची माहितीही बच्चू कडू यांनी पत्रातून दिली आहे. तसेच, प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीतावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी बच्चू कडू यांनी पत्रातून केली आहे.

दरम्यान, सध्या बच्चू कडू यांना पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा दिली आहे. बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीनं संपूर्ण अमरावतीत खळबळ पसरली आहे. बच्चू कडू यांचा घातपात करण्याचा कोणाचा प्लॅन तर नाही ना? अशा चर्चाही संपूर्ण जिल्ह्यात पसरल्याचं पाहायला मिळतंय. 

बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहलेल्या पत्रातील ठळक मुद्दे

"शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोलीत राहत असून माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहेत, बच्चू कडूला पाहून घेऊ जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवले, तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाही तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही बच्चू कडूला पाहून घेऊ", अशा धमक्या येत असल्याचं बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केलं आहे.  "आज मौका देख के, बच्चू कडू को चौका मारेंगे", अशी धमकी येत असल्याचंही बच्चू कडूंनी पत्रात नमूद केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget