एक्स्प्लोर

Bacchu Kadu : मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी शेतकऱ्यांना मदत द्या, बच्चू कडूंची मागणी

मुसळधार पावसाचा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी अचलपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

Bacchu Kadu : अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचा शेतकऱ्यांच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे. अनेकांची जमीन खरवडून गेली आहे तर काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं आहे. या मुसळधार पावसाचा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी अचलपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी केली आहे.

आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळेल 

मुसळधार पावसामुळं अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी बच्चू कडू यांनी केली. यावेळी त्यांनी लवकरच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.  


Bacchu Kadu : मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी शेतकऱ्यांना मदत द्या, बच्चू कडूंची मागणी

आम्ही इथे असताना कृषी मंत्र्यांची काय गरज 

राज्यात कृषी मंत्री नसले तर आम्ही इथे आहोत. आम्ही असताना कृषी मंत्र्यांची काही गरज नसल्याचे बच्चू कडू म्हणाले. नुकसानीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आढावा घेत आहेत. एकाच दिवशी मोठा पाऊस आल्यानं ही स्थिती झाल्याचे ते म्हणाले. या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट देखील ओढावलं आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमीनी देखील खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत मी स्वत: मुख्यमंत्री एकनात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. फक्त अचलपूरच नाही तर संपूर्ण विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी करणार आहे. ज्या ठिकाणी पंचनामे झाले आहे, त्यांना तत्काळ मदत मिळणे गरजेचे असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यानं खचून जाऊ नये, आम्ही तुमच्या पाठीशी

या संकटात शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम हे सरकारचं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिल अशी खात्री असल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुलं कोणत्याही शेतकऱ्यानं खचून जाऊ नये. आम्ही तुमच्या सोबत आहोत. अडचणी असल्यास आम्हाला सांगा, आम्ही मदतीला धावून येऊ असेही ते म्हणाले. मी माझ्या शेतात चार वेळा तूर पेरली पण चारही वेळ डुकरांनी ती खाऊन टाकल्याचे बच्चू कडू म्हणाले. ज्वारी जशी कमी झाली, तशी पेरणी देखील कमी होण्याची शक्यता आहे. येत्या 10 दिवसात दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळेल असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:



महत्त्वाच्या बातम्या

नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Amravati News: मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर रात्री 'ओली पार्टी'? जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, नगराध्यक्षाकडूनही स्पष्टीकरण
मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर रात्री 'ओली पार्टी'? जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, नगराध्यक्षाकडूनही स्पष्टीकरण
Amravati Moshi : धक्कादायक! ऐन दुष्काळी परिस्थितीत मोर्शी नगरपरिषद इमारतीच्या छतावर रंगली चक्क 'ओली पार्टी'; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! ऐन दुष्काळी परिस्थितीत मोर्शी नगरपरिषद इमारतीच्या छतावर रंगली चक्क 'ओली पार्टी'; ड्रोनमध्ये चित्रित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Pune News : ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, पोस्ट करत म्हणाल्या 'माझ्या कृतीचा विपर्यास केला'
Maharashtra Live blog updates: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, पोस्ट करत म्हणाल्या 'माझ्या कृतीचा विपर्यास केला'
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
Embed widget