एक्स्प्लोर

सूर्य कोपला! विदर्भात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 

दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास होत आहे.

Maharashtra Weather News :  दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास होत आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट नोंदवण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आऐलं आहे. कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद झाली? कुठे उष्णतेची लाट निर्माण झाली? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

'या' जिल्ह्यात उष्णतेची लाट

आज राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. आज अमरावती, अकोला, ब्रह्मपुरी आणि यवतमाळमध्ये उष्णतेची लाट नोंदवण्यात आली आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

नागपूर - 39
अकोला - 42
अमरावती - 42.2
ब्रह्मपुरी - 40.8
चंद्रपूर - 40.2
वर्धा - 40.2
वाशिम - 40.2
यवतमाळ - 40
बुलढाणा - 39.5
गडचिरोली - 39.4
जळगाव - 40.1
पुणे - 38.1
परभणी - 39.8
सांताक्रुज - 33.1
बीड - 38.5
नाशिक - 38.5
कोल्हापूर - 37.1
सातारा - 37.5
सोलापूर - 39.1
संभाजीनगर - 39.8
मालेगाव - 39.6
सांगली - 38
नवी मुंबई - 39
नंदुरबार - 41

नाशिकमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकचा पारा 38.5 अंशावर गेला आहे, कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत आहे. किमान तपमान 16. 8 अंश सेल्सिअस आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तापमानात वाढ झाल्याने दुपारी उकाडाही जाणवत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान होते. तर राज्यातील उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार तापमानात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान होते. उद्याही पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. तापमानात वाढ झाल्याने राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटकाही वाढत आहे. 

तापमाना वाढल्यानं शाळांच्या वेळात बदल

होळीचा सण पार पडला की उन्हाची तीव्रता जाणवायला सुरुवात होते, असे ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध सांगत असतात. त्याचनुसार आता उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली असून मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात अनेक जिल्ह्यात सूर्य कोपल्याचं दिसून येतं. विदर्भाने तापमानाने चाळीसी पार केली असून पुणे, सोलापूरातही तापमानाचा पार चढला आहे. एकीकडे 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून शालेय (School) विद्यार्थ्यांच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विदर्भातील उन्हाचा पारा लक्षात घेता, बुलढाण्यातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. 

उन्हाच्या तडाख्यापासून बवाच आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा बुलढाणा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शाळेच्या वेळेसंदर्भात आदेश काढले आहेत. विदर्भात उन्हाचा तडाखा वाढतच असून बुलढाणा जिल्ह्याचे तापमान ही वाढतच आहे. जिल्ह्याचे तापमान 39 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले असून या तापमानाचा परिणाम आता जिल्हा परिषद शाळेवरही होत आहे. विद्यार्थ्यांना तापमानाचा कोणताही त्रास होऊ नये, म्हणून बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.  

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक हादरलं! कोयत्याने वार करत महिलेने एका व्यक्तीला संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर 
नाशिक हादरलं! कोयत्याने वार करत महिलेने एका व्यक्तीला संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर 
कॅबिनेटचा निर्णय, MPSC मध्ये बदल; संयुक्त परीक्षा योजनेत नव्याने 18 सेवा अन् 93 संवर्गाचा समावेश
कॅबिनेटचा निर्णय, MPSC मध्ये बदल; संयुक्त परीक्षा योजनेत नव्याने 18 सेवा अन् 93 संवर्गाचा समावेश
अकोल्यात मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद, पारा 43.8 अंशांवर, तर सोलापुरातही उन्हाचा चटका वाढला 
अकोल्यात मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद, पारा 43.8 अंशांवर, तर सोलापुरातही उन्हाचा चटका वाढला 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले अनंतात विलीन
Mumbai Asha Bhosle Funeral : आशाताईंचं निधन, कुटुंबीयांना अश्रू अनावर, सचिन तेंडुलकरही हळहळला..
Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Gujarat Election :  एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात, गुजरातमध्ये अनोखा प्रकार, उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस
एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात,उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस?
Pope Leo on Donald Trump: विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
RBI : आरबीआयकडून महाराष्ट्रातील एका बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध, पैसे काढणे, ठेवी स्वीकारण्यास मनाई, कारण समोर
RBI कडून महाराष्ट्रातील एका बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध, पैसे काढणे, ठेवी स्वीकारण्यास मनाई, कारण समोर
Iran War: अमेरिकेची चीनला पहिल्यांदा 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी, आता तेल खरेदीची ऑफर, इराणवरुन ट्रम्प यांचा गोंधळात गोंधळ
अमेरिकेची चीनला पहिल्यांदा 50 टक्के टॅरिफची धमकी, आता तेल खरेदीची ऑफर,ट्रम्प यांचं नेमकं काय सुरु?
Muhoozi Kainerugaba: '1 अब्ज डॉलर्स आणि देशातील सर्वात सुंदर महिला मला बायको म्हणून द्या, अन्यथा पुढील 30 दिवसात..' युगांडाच्या लष्करप्रमुखाची 'नाटो' सदस्य तुर्कीला थेट धमकी
'1 अब्ज डॉलर्स आणि देशातील सर्वात सुंदर महिला मला बायको म्हणून द्या, अन्यथा पुढील 30 दिवसात..' युगांडाच्या लष्करप्रमुखाची 'नाटो' सदस्य तुर्कीला थेट धमकी
धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांची टीप; शिवसेना वादावर श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांची टीप; शिवसेना वादावर श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
Embed widget