एक्स्प्लोर

US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान

Share Market : भारतीय शेअर बाजारात अमेरिका आणि इराण यांचं युद्ध सुरु झाल्यापासून मोठी घसरण सुरु आहे. यामुळं सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण सुरु आहे. 

मुंबई : भारतीय शेअर बाजारात 13 मार्चला देखील मोठी घसरण झाली. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टी  11 महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. आखाती देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतलीय.भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स  1471 अंकांनी घसरुन 74564 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 488 अंकांनी घसरुन 23151 अंकांवर आला. निफ्टी 7 एप्रिल 2025 नंतर पहिल्यांदा 23200 च्या खाली आला आहे. 

निफ्टी 50 निर्देशांकात या आठवड्यात 5 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. ही गेल्या चार वर्षातील सर्वाधिक खराब कामगिरी आहे. जून 2022 मध्ये निफ्टी एका आठवड्यात 5 टक्क्यांनी घसरला होता. तर, सेन्सेक्स 5.5 टक्क्यांनी घसरला, ही गेल्या चार वर्षातील खराब कामगिरी आहे. 

Share Market Loss : गुंतवणूकदांरांचे 33 लाख कोटी बुडाले

विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्यानं सुरु असलेल्या विक्रीच्या सत्रामुळं इतर गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागत आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 9 मार्च ते 13 मार्च या कालावधीत 20 लाख कोटींनी कमी झालं आहे. तर, अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सुरु झाल्यापासून गुंतवणूकदारांनी 33 लाख कोटी गमावले आहेत. म्हणजे सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 33 लाख कोटींनी कमी होऊन 430 लाख कोटींवर पोहोचलं आहे. 

बाजार विश्लेषकांच्या मते भारतीय शेअर बाजारासमोरील प्रमुख आव्हान म्हणजे ब्रेंट क्रुड ऑईलच्या वाढत्या किमती हे आहे. ब्रेंट क्रूड ऑईलसाठी सध्या 102 डॉलर प्रति बॅरल मोजावे लागत आहेत. 

विशेष बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं आपात्कालीन साठ्यातून 40 कोटी बॅरल तेल जारी करण्याचा निर्णय आणि समुद्रात असलेल्या जहाजांमधील रशियाच्या तेल खरेदीला अमेरिकेनं परवानगी देऊनही ब्रेंट क्रुड ऑईलच्या दरात घसरण झालेली नाही. आखाती देशात सुरु असलेल्या संघर्षामुळं तेलाच्या पुरवठ्या बाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी होण्याचे कोणतेही संकेत मिळत नसून यामुळं बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे. 

गोल्डमॅन सॅक्सनं दिलेल्या इशाऱ्यानुसार जर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा पुरवठा खंडित राहिला तर ब्रेंट क्रुड ऑईलचे दर 150 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचू शकतो. जर अशी स्थिती निर्माण झाली तर जागतिक अर्थव्यवस्था आणि जगभरातील शेअर बाजारांसाठी धक्कादायक स्थिती असेल. 

अमेरिकन डॉलर मजबूत होणं देखील इतर बाजारांसाठी चिंता निर्माण करणारी स्थिती आहे. डॉलर मजबूत झाल्यानं विदेशी गुंतवणूकदार इतर बाजारांमधून पैसे काढत आहेत, याचा भारताच्या शेअर बाजारावर देखील परिणाम होत आहे.   

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! चांदी खरेदी करायचीय? 10 पैकी 3 लोकांची फसवणूक, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
सावधान! चांदी खरेदी करायचीय? 10 पैकी 3 लोकांची फसवणूक, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
संकटात दिलासादायक बातमी! 53 लाख LPG सिलेंडर वितरीत, पुरवठा साखळी होणार सुरळीत
संकटात दिलासादायक बातमी! 53 लाख LPG सिलेंडर वितरीत, पुरवठा साखळी होणार सुरळीत
LIC च्या या दोन योजनेत गुंतवणूक करा, आयुष्यभर उत्पन्न मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती  
LIC च्या या दोन योजनेत गुंतवणूक करा, आयुष्यभर उत्पन्न मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती  
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
Embed widget