(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच, शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली, शेतकरी चिंतेत
ल्या 48 तासापासून बुलढाणा जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळं सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या पावसाचाशेती पिकांना मात्र मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे.
Buldhana Rain : मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या 48 तासापासून बुलढाणा जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळं सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या पावसाचाशेती पिकांना मात्र मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. संततधार सुरु असलेल्या पावसानं सोयाबीन, कापूस, तूर यासारखी पिकं कुजण्याची भीती व्यक्त होत आहे. अद्यापही शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळं आणि कमी पावसानं विदर्भातील शेतकरी शक्यतो कमी पावसात येणारी किंवा कमी दिवसात येणारी सोयाबीन सारखी पिके खरीप हंगामात घेत असतात. सोयाबीन हे कमी पाण्यात आणि 90 ते 110 दिवसात येणारी पीकं आहेत. पण यावर्षी नुकतीच पेरणी केलेलं सोयाबीन चांगलं उगवलेली असताना मात्र आता गेल्या 48 तासापासून सुरु असलेल्या पावसानं ही कोवळी पिकं आता सडण्याच्या कुजण्याच्या मार्गावर आहेत. पाण्याखाली शेकडो हेक्टरवरील पिकं गेली आहेत. यामुळं मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या शेकडो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. आजही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी पूरससृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Maharashtra Rains : पालघरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत
- Gadchiroli Rain : गडचिरोलीतील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 10 मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला