Amravati Murder Case : उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी दोन जण अटकेत, आतापर्यंत नऊ जणांना अटक
अमरावती न्यायालयाने 7 ऑगस्टपर्यंत ट्रांजिट रिमांड देण्यात आली असून उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी आता एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे.
Amravati Murder Case : अमरावती येथील मेडिकल उमेश कोल्हे (Umesh Kolhe Murder) हत्याकांड प्रकरणी एनआयएच्या पथकाकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. मुशफीक अहमद अब्दुल रशीद (वय 41) आणि अब्दुल अरबाज अब्दुल सलीम (वय 23) असं अटक केलेल्या आरोपींच नाव आहे. अटक केलेल्यामध्ये उमेश कोल्हे हत्येचा मुख्य आरोपी इरफान खान यांचा तो ड्रायव्हर आहे. तर दुसरा आरोपी हा इरफान खान यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे..
NIA ची टीम अजूनही अमरावती शहरातच असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आज या दोन्ही आरोपींना अमरावती न्यायालयाने 7 ऑगस्टपर्यंत ट्रांजिट रिमांड देण्यात आली असून उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी आता एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे.
धी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्यांची हत्या करण्यात आली. चौकशीत असे आढळून आले की, 19 जून रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी शोएब खान भुर्या हा त्याच्या एका साथीदारासह उमेशला मारण्यासाठी गेला होता. मात्र त्यावेळी तो थोडा घाबरला होता. त्यानंतर तो 20 तारखेला पुन्हा मारायला गेला, मात्र त्या दिवशी उमेश रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद करुन लवकर घरी गेला होता. त्यामुळं उमेशचा जीव वाचला. त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे 21 जून रोजी पाच लोक एकत्र गेले. तीन लोक बाईकवर होते. दोन लोक त्यांना उमेश कुठे पोहोचला याची माहिती देत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तपसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे