Drishyam 3 : 'दृश्यम 3'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार; अजय देवगण अन् मोहनलाल एकत्र झळकणार
Drishyam 3 : 'दृश्यम 3'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.
Drishyam 3 : 'दृश्यम' (Drishyam) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्यामुळे या सिनेमाचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहनलाल (Mohanlal) सध्या 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमावर काम करत आहे.
अजय देवगणच्या (Ajay Devgan) 'दृश्मम 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. हिंदी सिनेमांच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत 'दृश्यम 2'ची गणना होते. या सिनेमात अजय देवगण, तब्बू आणि अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर अभिषेक पाठकने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'या' भाषांमध्ये प्रदर्शित होणार 'दृश्यम 3'
'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. आता या सिनेमाचा तिसरा भाग मल्याळम आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमात अजय देवगण आणि मोहनलाल एकत्र झळकणार आहेत. 'दृश्यम 3' हा सिनेमा आधी मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर हिंदीत प्रदर्शित करण्यात येणार आहे.
'दृश्यम 3'च्या कथानकावर काम सुरू
'दृश्यम 2'च्या हिंदी रिमेकमध्ये अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना, श्रेया सरन, इशिता दत्ता, सौरभ शुक्ला, मृणाल जाधव आणि रजत कपूर महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यामुळे आता 'दृश्यम'च्या तिसऱ्या भागात कोण झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'दृश्यम 2' या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं होतं. त्यामुळे 'दृश्यम 3'वरदेखील निर्माते खूप मेहनत घेत आहेत. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे.
थरार-नाट्य असणारा 'दृश्यम 3'!
'दृश्यम 2' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 'दृश्यम 3' हा सिनेमा नोव्हेंबर 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 'दृश्यम 3' हा सिनेमा रिलीज होण्याआधी प्रेक्षकांना 'दृश्यम 2' हा सिनेमा पाहायचा असेल तर प्रेक्षक प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा पाहू शकतात. थरार-नाट्य असणाऱ्या या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या