(Source: ECI/ABP News/ABP Majha)
7 दिवसांपासून कृषी अभियंत्याचे आंदोलन सुरूच, राज्य सरकारचे मात्र दुर्लक्ष
रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसा ऊन या परिस्थितीत गेल्या सात दिवसापासून राज्यातील कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्णया विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे.
Rahuri Agricultural University : रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसा ऊन या परिस्थितीत गेल्या सात दिवसापासून राज्यातील कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्णया विरोधात धरणे आंदोलन सुरू केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठास राज्यातील चारही विद्यापीठ आवारात हे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा सातवा दिवस असून अद्यापही राज्य सरकार अथवा लोकसेवा आयोगाने त्याची दखल घेतली नाही.. गेल्या सात दिवसात अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती सुद्धा ढासाळली असून सरकार नेमकं कशाची वाट पाहतेय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC) घेण्यात आलेला निर्णय कृषी अभियंत्यावर अन्यायकारक असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली 2021 कृषी सेवा मुख्य परीक्षा स्थगित करावी. तसेच आगामी काळात घेण्यात येणारी कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील चारही कृषी विद्यापीठाच्या आवारात आंदोलन सूरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठाच्या आवारात सुरु असलेल्या धरणे आंदोलनात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या सात दिवसात अनेक राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनास्थळी जात पाठिंबा सुद्धा दिला आहे. मात्र सरकारच याकडं दुर्लक्ष झालं आहे. आंदोलनाचा आढावा घेत या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आहे.
अभ्यासक्रम बदलताना चारही कृषी विद्यापिठांच्या कुलगुरूंना विश्वासात घेणं गरजेचं होतं. अगोदरच कृषी अभियंत्यांना सरकार नोकरीत सामावून घेत नाहीत. त्यानंतर आता या नवीन निर्णयामुळे राज्यातील कृषी अभियांत्रिकी शिक्षण बंद पडण्याचा धोका निर्माण झाल्याचं वक्तव्य दिलीप पवार यांनी केलं आहे. पुणे येथे रस्त्यावर उतरून आज झालेल्या आक्रमक आंदोलनाची सरकारने तात्काळ दखल घेत मार्ग काढला. मात्र गेल्या सात दिवसापासून प्रकृती सांभाळत कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या देशात शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घ्यायला सरकारला वेळ नाही हे विशेष आहे.
प्रमुख मागण्या काय आहेत ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली 2021 कृषी सेवा मुख्य परीक्षा स्थगित करण्यात यावी.
घेण्यात येणारी कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 रद्द करावी...
स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे...
मृद आणी सलसंधारण विभागात कृषी अभियंत्यांची भरती प्रक्रिया राबवावी...
आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षेत कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करावा.