(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar News : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, जाब विचारण्यास गेल्यावर वडिलांसह मुलीवर दगडाने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन मुलगी मोटार बंद करण्यासाठी गेली होती. त्याचवेळी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मुलीचा आवाज झाल्याने वडील घराबाहेर आले व पुढील अनर्थ टाळला.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये (Ahmednagar News) रात्रीच्या वेळी मोटार बंद करण्यासाठी गेल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, मुलीच्या आवाजानंतर वडील घराबाहेर तत्काळ आल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील जखणगावमध्ये घडली. दरम्यान मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर मुलीसह वडिलांवर सुद्धा दगडाने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
मुलगीसह वडिलांवर सुद्धा दगडाने हल्ला करण्यात आला
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर सहा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन मुलगी मोटार बंद करण्यासाठी गेली होती. त्याचवेळी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मुलीचा आवाज झाल्याने वडील घराबाहेर आले व पुढील अनर्थ टाळला. बाहेर आलेल्या वडिलांना पाहून अंधाराचा फायदा घेत त्या संबंधित मुलाने तेथून पळ काढला. यावेळी मुलगा माहित झाल्याने ते जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र जाब विचारण्यासाठी गेले असता मुलगीसह वडिलांवर सुद्धा दगडाने हल्ला करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या