एक्स्प्लोर
सलमानचा 'सुल्तान' या पाच चित्रपटांचे रेकॉर्ड तोडणार

1/6

सुल्तान चित्रपटामुळे आणखीन एक विक्रम सलमानच्या नावावर नोंदवला जाऊ शकतो. सलमानच्या १०० कोटी क्लबमध्ये सहभागी चित्रपटातील त्याचा हा दहावा चित्रपट असेल. आजपर्यंत कोणत्याही बॉलीवूड स्टारच्या नावावर असा विक्रम नोंद नाही.
2/6

सलमानसोबतच अनुष्का शर्मासाठीही हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट असेल. अनुष्काच्या पीकेनेच आजपर्यंत चांगली कमाई केली होती.
3/6

सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाने रिलीच्या पहिल्या दिवशीच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४०.३५ कोटींचा गल्ला गोळा केला होता. पण सुल्तानच्या हिट ट्रेलर मुळे या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
4/6

सलमानच्या 'बजरंगी भाईजान' आणि 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटांचे शाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर' या चित्रपटापेक्षा कलेक्शन कमी होते. शाहरूखच्या 'हॅपी न्यू इअर'ने ४४.९७ कोटींचे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्या दिवशी केले होते.
5/6

वास्तविक, स्पोर्टस आणि बॉलीवूड हे समीकरण बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झाले नाही. आजपर्यंच्या बॉक्स ऑफिसच्या रेकॉर्डनुसार, फरहान अख्तरचा बायोपिक 'भाग मिल्खा भाग' हा सर्वाधिक यशस्वी चित्रपट राहिला आहे. पण सलमानचा सुल्तान ६ जुलै रोजी फरहान अख्तरच्या या चित्रपटाला मागे टाकेल अशी कमाई करु शकतो. या चित्रपटात सलमान एका कुस्तीपटूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
6/6

गेल्या काही वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर ईद आणि सलमान खानचा चित्रपट असे समीकरणच झाले आहे. सलमान खान ज्या चित्रपटात असेल तो चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करतो आहे. सलमान आपल्या चाहत्यांनाही ईदचे नेहमीच गिफ्ट देत आला आहे. या ईदवेळीही सलमानने आपल्या चाहत्यासाठी सुलतान हा जबरदस्त अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटींसाठी आणला आहे.
Published at : 05 Jul 2016 09:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
