एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jamia Protests | हिंसेचा व्हिडीओ अक्षयकडून लाईक, नेटीझन्सनी झोडपल्यानंतर सारवासारव
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात जामियाचे विद्यार्थी आणि दिल्ली पोलिस यांच्यात हिंसा झाली. यावेळी आंदोलनात बसला आग लावली आणि लाठीचार्जही झाला.
मुंबई : नागरिकतत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. देशातील प्रमुख विद्यापीठापैकी एक असलेल्या जामिया मिल्लिया इस्लामियाचे विद्यार्थीही या कायद्याचा जोरदार विरोधत करत आहेत. मात्र जामियामध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या एका ट्वीटची चर्चा सुरु आहे. अक्षय कुमारने या ट्वीटद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. हिंसेची थट्टा करणारं ट्वीट सुरुवातीला लाईक केलं आणि मग ते अनलाईक केलं.
दिल्लीच्या जामियानगर परिसरात पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात नाराजी आहे. अशातच बॉलिवूड कलाकार या मुद्द्यावर काय भाष्य करतात याची प्रतीक्षा करत होते. मात्र बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने असं काही केलं की तो नेटीझन्सच्या नजरेत आला.
अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील हिंसेची थट्टा करणारं ट्वीट लाईक केलं. मात्र त्यानंतर अक्षयने तो अनलाईक केलं. या लाईक आणि अनलाईकच्या काळात अक्षय कुमारवर काही जणांनी टीका करण्यास सुरुवात केली. एक कलाकार असल्याने हिंसेची थट्टा करणाऱ्यांचं समर्थन करताना पाहून नेटीझन्सनी अक्षय कुमारला खडे बोल सुनावले.
पण यानंतर अक्षय कुमारने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. अक्षयने ट्वीट केलं आहे की, "जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांचं ट्वीट लाईक करण्याबाबत बोलायचं झालं तर ते माझ्याकडून चुकून झालं. मी स्क्रोल करत होतो आणि चुकून माझ्याकडून लाईक प्रेस झालं. माझ्या लक्षात येताच मी ते ट्वीट अनलाईक केलं. मी अशा कोणत्याही गोष्टींचं समर्थन करत नाही."
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात जामियाचे विद्यार्थी आणि दिल्ली पोलिस यांच्यात हिंसा झाली. यावेळी आंदोलनात बसला आग लावली आणि लाठीचार्जही झाला. या कायद्याविरोधात दिल्लीसह आसम, हैदराबाद, अलीगड आणि कोलकातामध्ये आंदोलन सुरु आहे. संबंधित बातम्या Jamia Protest : विद्यार्थी आहेत म्हणून हिंसक आंदोलनाचा अधिकार नाही : सरन्यायाधीश नागरिकत्व दुरुस्ती कायदा सावरकरांच्या विचारांविरोधात; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला नागरिकत्व कायद्याविरोधात अलीगड विद्यापीठात विद्यार्थांचं हिंसक आंदोलन, विद्यापीठ 5 जानेवारीपर्यंत बंदRegarding the ‘like’ on the tweet of Jamia Milia students, it was by mistake. I was scrolling and accidentally it must have been pressed and when I realised I immediately unliked it as In no way do I support such acts.
— Akshay Kumar (@akshaykumar) December 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
Advertisement