एक्स्प्लोर

नागरिकत्व दुरुस्ती कायदा सावरकरांच्या विचारांविरोधात; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष ज्या सावरकरांच्या विचारांना मानतो, त्या सावरकरांना हा कायदा मान्य झाला नसता.

नागपूर : देशातील चर्चांच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकत्व मुद्द्यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे जुने मित्र उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांविरोधात आहे. हा सावरकरांचा अपमान आहे. नागपूरमध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, सिंधू नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या भूमीला एक देश बनवणे, हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वप्न आणि ध्येय होते. परंतु भाजप सरकार सावरकरांच्या विचारांच्या विरोधात जाऊन सिंधू नदीजवळच्या आणि पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना भारतात घेऊन त्यांना नागरिकत्व देत आहे. हा सावरकरांचा अपमान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष ज्या सावरकरांच्या विचारांवर बनला आहे, त्या सावरकरांना हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा मान्य झाला नसता. सध्या देशात महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि कृषी संकट हे मोठे प्रश्न आहेत. परंतु नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे लोकांचे मूळ मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, माध्यमांनी उद्धव ठाकरेंना राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतरची शिवसेनेची भूमिका काय? महाविकास आघाडीचं भविष्य काय? असे सवाल केले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहोत. आम्ही भिन्न विचारांची माणसं आहोत. कालही आमच्या विचारात भिन्नता होती. आजही त्यात भिन्नता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची भूमिका शिवसेनेने मांडली आहे. मात्र, सरकार चालवण्यासाठी समान कार्यक्रम ठरवला आहे. सरकार म्हणून आमच्यात एकवाक्यता आहे. शिवसेनेच्या भूमिकेविषयी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्याबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. भाजपने आम्हाला सावरकरांच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये. मात्र देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर उफाळलेल्या हिंसाचाराचं काय? असा सवाल त्यांनी भाजप नेत्यांना केला आहे. पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget