एक्स्प्लोर

नागरिकत्व कायद्याविरोधात अलीगड विद्यापीठात विद्यार्थांचं हिंसक आंदोलन, विद्यापीठ 5 जानेवारीपर्यंत बंद

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव वाढला होता. त्यानंतर अलीगड विद्यापीठातही विद्यार्थांनी हिंसक आंदोलन केलं.

अलीगड : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील हिंसाचारानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठातही मोठा गदारोळ पाहायला मिळाला. अलीगड मुस्लीम विद्यापीठात रविवारी संध्याकाळी विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करत दगडफेक केली. या गोंधळानंतर परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी 5 जानेवारीपर्यंत  विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेकडो आंदोलक विद्यार्थी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा बाब-ए-सर सय्यद गेटवर एकत्र जमले होते. ठिकठिकाणी लावलेले बॅरिगेट्स विद्यार्थ्यांनी तोडून टाकले आणि एकएकी दगडफेक सुरु केली. विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठिचार्ज केला आणि अश्रूधूराच्या नळकांड्यांचाही वापर केला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी केलेल्या लाठिचार्जमध्ये 60 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना नेहरु मेडिकल कॉलेज ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव वाढला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही सुरक्षारक्षकही जखमीही झाले. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सर्व रस्ते बंद केले होते. विद्यापीठातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन वातावरण शांत होईपर्यंत विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉस्टेल्सही खाली करण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्राध्यापक अफीफ उल्लाह खान यांनी दिली.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोनल सुरु आहे. या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण घेतलं. आंदोलक विद्यार्थ्यांनी तीन बस आणि काही दुचाकी पेटवल्यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त विद्यापीठ परिसरात तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे. आप नेते अमानुतुल्ला यांच्यावर हिंसा भडकावण्याच आरोप करण्यात येत आहे, मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विधेयक संसदेत मांडल्यापासूनच याला विरोध सुरु झाला होता. विधेयकाच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याची तीव्रता अधिक वाढली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता नागरिकत्व संशोधन विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील सहा समुदायातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि इसाई या सहा समुदायातील लोक जे 31 डिसेंबर, 2014 आधी भारतात आले आहेत, त्यांना सरसकट भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
Embed widget