एक्स्प्लोर

सर्व अभिनेत्यांना मागे टाकत 2019 मध्ये अक्षय कुमार बनला बॉक्स ऑफिसचा किंग!

अक्षय कुमारने 2019 ची सुरुवात दमदार केली होती. अक्षयच्या चित्रपटांनी यावर्षी बॉक्स ऑफिसवर एकूण 665.89 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

मुंबई : एकामागोमाग एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा बादशाह बनला आहे. अक्षयसाठी 2019 हे साल फारच दमदार ठरलं. मागील वर्षी अक्षयचे केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल 4 आणि गुड न्यूज यांसारखे चित्रपट केले. या सिनेमांच्या कमाईच्या बाबतीत अक्षय कुमारने इतर कलाकारांना मागे टाकलं आहे. अक्षयच्या चित्रपटांनी यावर्षी बॉक्स ऑफिसवर एकूण 665.89 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

अक्षयने 2019 ची सुरुवात दमदार केली होती. मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'केसरी' चित्रपटाने जवळपास 151.87 कोटी रुपयांची कमाई केली होती. 'केसरी'च्या यशानंतर अक्षयने विद्या बालन आणि इतर कलाकारांसोबत मिळून 'मिशन मंगल' हा स्पेस ड्रामा बनवला. मिशन मंगलने 100 कोटी क्लबमध्ये सहजरित्या प्रवेश केला आणि चित्रपटाने एकूण 192.66 कोटी रुपयांची कमाई केली होती.

या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर अक्षय कुमारने 'हाऊसफुल 4'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हा विनोदी चित्रपट 205.60 कोटी रुपयांच्या कमाईसह 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. भारतीय बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा 'गुड न्यूज' हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. केवळ सहा दिवसातच चित्रपटाने 115.75 कोटी रुपये कमावले आहेत.

या चार चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण 665.89 कोटी रुपये कमावण्यात अक्षय कुमारला यश आलं आहे. दशकाचं अखेरचं वर्षही अक्षयसाठी शानदार ठरलं. मागील वर्ष अतिशय चांगलं गेल्यानंतर अक्षय 2020 मध्येही आपल्या चाहत्यांसाठी अनेक चित्रपट घेऊन येत आहे. यंदा अक्षयचे 'सूर्यवंशी', 'पृथ्वीराज' 'लक्ष्मी बॉम्ब' आणि 'बच्चन पांडे' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

कमाईच्या बाबतीत अक्षय कुमारनंतर अभिनेता हृतिक रोशनचा क्रमांक लागतो. 2019 मध्ये हृतिकच्या दोन चित्रपटांनी 464.01 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर आयुष्मान खुरानाच्या तीन चित्रपटांनी 386.18 कोटी रुपयांची कमाई केली. याशिवाय बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या दोन चित्रपटांनी 2019 मध्ये बॉक्स ऑफिसवर 383.77 कोटी रुपये कमावले आहेत. तर अजय देवगणने दोन चित्रपटांमधून 305.47 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

सर्व अभिनेत्यांना मागे टाकत 2019 मध्ये अक्षय कुमार बनला बॉक्स ऑफिसचा किंग!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार
सर्वांना पेन्शन देण्याची सरकारची तयारी, EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, योजनांचं एकत्रीकरण करणार
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Trimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दीABP Majha Headlines : 07 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPrajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार
सर्वांना पेन्शन देण्याची सरकारची तयारी, EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, योजनांचं एकत्रीकरण करणार
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Weather Update: उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
Holidays In March 2025 : मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
Embed widget