LIVE BLOG : हाऊडी मोदी । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी थोड्याच वेळात संबोधित करणार

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 21 ऑक्टोबरला मतदान, तर 24 ऑक्टोबरला निकाल, इच्छुकांची धाकधूक वाढली
2. स्वतंत्र लढल्यास भाजप बहुमताजवळ तर महायुतीसह लढल्यास 200 पार, ओपिनियन पोलचा अंदाज, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आघाडीवर
3. पितृपक्षानंतरच युतीची घोषणा, सूत्रांची माहिती, तर अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर, उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता
4. सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत नाही, निवडणूक आयोगाची माहिती, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या उदयनराजेंना धक्का
5. भारतातून ऑस्करसाठी गली बॉयची एन्ट्री, अंधाधून, आर्टिकल-15 आणि तमिळ सिनेमा सुपर डिलक्सला मागे टाकत गली बॉयची सरशी
6. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यूस्टनमध्ये दाखल, आज अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बैठक, हाऊडी मोदी कार्यक्रमातही ट्रम्प सहभागी होणार























