LIVE BLOG : राहुल गांधींनी अध्यक्षपद कायम ठेवावं, याबाबत ठराव : अशोक चव्हाण
LIVE
Background
1. आज संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, विरोधकांसह बिमस्टेकचे प्रमुख उपस्थित राहणार
2. जेटलींच्या निवृत्तीमुळे अर्थमंत्रीपद पियुष गोयलांना संधी मिळण्याची शक्यता, मोदींच्या इतर मंत्रिमंडळाची सर्वांनाच उत्सुकता
3. शिवसेनेकडून अरविंद सावंत यांना मंत्रिपदाची संधी, कुटुंबियांसह उद्धव ठाकरे दिल्लीत तर अधिवेशनानंतर अन्य मंत्री शपथ घेणार
4. लोकसभेतल्या पानिपतानंतर आघाडीत मोठी अस्वस्थता, अनेक बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा, काँग्रेस नेत्यांकडून मात्र इन्कार
5. प्रकल्पाच्या मान्यतेसाठी केंद्रीय मंत्र्याकडून बॉलिवूडच्या 2 नायिकांची मागणी, सुब्रह्मण्यम स्वामींच्या ट्विटनं स्फोट, मंत्र्याची नावं मात्र गुलदस्त्यात
6. इंग्लंडमध्ये आजपासून आयसीसी विश्वचषकाची रणधुमाळी, यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये रंगणार सलामीचा सामना