LIVE BLOG | मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार, 16 ऐवजी 18 ऑगस्टपासून रेल्वेसेवा सुरू होणार
LIVE
Background
1.आज देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन, सकाळी 7.30 वाजता दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा सोहळा, दिवसभर माझावर खास कार्यक्रम
2. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर, महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेनापदक तर स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगुलचं डुडुल
3. कलम 370 रद्द केल्यानं बिथरलेल्या पाकिस्तानच्या पोकळ धमक्या, पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं कारवाई केल्यास युद्ध पुकारू, इम्रान यांची दर्पोक्ती
4. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर औरंगाबादमध्ये हाय अलर्ट जारी, एका संशयीताचा स्केचद्वारे शोध सुरु, संशयीताच्या हालचालींवर पोलिसांचं लक्ष
5. पुणे-सोलापूर महामार्गानजीक दौंड एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग,केमिकल कंपनी असल्याची माहिती, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश
6. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर आकर्षक रोषणाई, सीएसटी, महापालिका, मंत्रालयासह सिद्धिविनायक मंदिरात दिव्यांची आरास