एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG : राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चेसाठी शरद पवारांचा मोदींना फोन
LIVE
Background
१. सांगली, कोल्हापुरात महापुरचा चौथा दिवस, राज्यात आतापर्यंत महापुरामुळे 28 जणांचा जीव गेला, आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
२. मुख्यमंत्र्यांकडून पुरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन, तर शरद पवारांकडून पूरग्रस्त भागासाठी 100 टक्के कर्जमाफीची मागणी, माझाच्या आवाहनानंतर राजकीया यात्रा रद्द
३. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चित्रपटसृष्टी सरसावली, सुबोध भावे, रवी जाधव, भाऊ कदम, मंगेश देसाईचा पुढाकार
४. भारतातील 19 विमानतळांवर हायअलर्ट जाहीर, मुंबईसह दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, लखनऊ विमानतळांवर कडेकोट सुरक्षा
५. कलम-370 रद्द केल्यानं काश्मीरचा विकास होईल, पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन, योग्य वेळी काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचही सुतोवाच
६. सोन्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक झळाली, प्रतितोळा 38 हजार रूपयांवर दर, रूपयाची घसरण आणि अमेरिका-चीन मधील तणावाचा फटका
22:34 PM (IST) • 09 Aug 2019
राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चेसाठी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली. राज्याला केंद्राची मदत मिळावी, यासाठी पवारांनी मोदींना विनंती केली. तसेच अल्मट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत देखील दोघांमध्ये चर्चा झाली.
19:17 PM (IST) • 09 Aug 2019
#Breaking श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने माजी अर्थमंत्री अरुण जेटली दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल
17:16 PM (IST) • 09 Aug 2019
बारामती : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शरद पवार यांनी बोलावली तातडीची बैठक, शहर आणि तालुक्यातील अनेक संस्था, पदाधिकारी, व्यापारी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु, पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात मदत पुरवण्यासाठी सुरु बैठक
13:28 PM (IST) • 09 Aug 2019
गोवा : महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील पुर परिस्थितीमुळे गोव्यात आजही तेथील दूध येऊ शकले नाही त्यामुळे आजही दुधाचा तूटवडा जाणवत आहे.काल 100 रूपयांना जुडी विकली जात असलेली कोथंबीर आज 60 रूपयांना म्हणजे तिनपट दराने विकली जात आहे.गोवा डेअरी बरोबर इतर कंपन्यांचे टेट्रा पॅक दूध उपलब्ध असून ग्राहकांकडून त्याची खरेदी केली जात आहे.काल रात्री पेट्रोल आणि डिझेलचा तूटवडा जाणवणार अशी अफवा उठल्याने राज्यात सगळीकडे पेट्रोल भरून घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.या अफवेत तथ्य नसल्याचे स्पष्ट करून देखील लोकांवर त्याचा अजिबात परिणाम झाला नाही.
15:50 PM (IST) • 09 Aug 2019
Load More
Tags :
Today's News In Marathi Abp Majha Latest Marathi News Trending News Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement