LIVE BLOG : नाशिक पोलिसांकडून शहरातील 13 पोलिस ठाण्याच्या हद्दीत 'ऑल आउट ऑपरेशन'
LIVE
Background
देशभरातील आणि राज्यातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. मुस्लीम समाजासाठी मोदी सरकारचं महत्वाकांक्षी पाऊल. 5 कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तर तिहेरी तलाक विधेयकला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मंजुरी
2. वायू वादळ गुजरातच्या वेशीपासून काहीशा अंतरावर, समुद्राला उधाण, दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, एक्स्प्रेस आणि हवाई वाहतूक थांबवली
3. चक्रीवादळाच्या तडाख्यानं चर्चगेटमध्ये होर्डिग कोसळून एकाचा मृत्यू तर वांद्र्यात स्कायवॉकचे पत्रे पडून 2 जखमी, पालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीवर शंका
4. राज्य सरकारचा शरद पवारांना मोठा धक्का, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी रोखलं, 12 वर्षाचं पाप 12 दिवसांत धुतल्याचा रणजितसिंहांचा टोला
5. आदित्य ठाकरे विधानसभा लवढण्याच्या हालचालींना वेग, मुंबईत युवासेनेकडून बॅनरबाजी, खासदार संजय राऊतांकडूनही संकेत
6. ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातला तिसरा विजय, कांगारुंची पाकिस्तानवर 41 धावांनी मात, आज विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना रंगणार